कोरोनाग्रस्ताच्या चुकीमुळे तरण्या डॉक्टरांचा मृत्यू
नगर:- कोरोना लपविण्याचे प्रकार होत आहेत. हा प्रकार आता रुग्णांसोबतच डॉक्टरांच्याही जीवावर बेतत आहे. नगरच्या एका खासगी रुग्णालयातील तरुण डॉक्टरचा मृत्यूही अशा प्रकारातून झाल्याचे समोर आले आहे. डॉ. प्रशांत जगताप (वय २६) असे या डॉक्टारांचे नाव आहे. डॉ. जगताप हे एका खासगी रुग्णालयात नोकरी करत होते. काल त्यांचा मृत्यू झाला. त्यांना करोनाची लागण झाली होती. रुग्णालयात आलेल्या एका रुग्णाला त्यांनी तापसले होते. प्राथमिक चौकशीत या रुग्णाने बरीच लक्षणे लपवून ठेवली. त्यांनी केलेला प्रवास, इतरांशी आलेले संपर्क ही माहिती विचारूनही ‘नाही‘ असे उत्तर दिले. त्यामुळे त्यांच्यावर नेहमीप्रमाणे उपचार करण्यात आले. दुसर्या दिवशी त्या रुग्णाच्या कुटुंबातील दुसरा सदस्य आजारी पडल्याने पुन्हा रुग्णालयात आला. त्याला कोरोनाची लक्षणे दिसत होती. तपासणी केली तर त्या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यांच्यावर उपचार करणाèया डॉक्टारांनाही त्याची बाधा झाली. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र, त्यांचा उपयोग झाला नाही. शेवटी तरुण डॉक्टरांचा मृत्यू झाला. या मृत्यूमुळे नगरचे वैद्यकीय विश्व हळहळले. डॉ. जगताप यांचे गेल्या वर्षी लग्न झाले होते. त्यांची पत्नी गरोदर आहे. अशा परिस्थिती तरुण डॉक्टरचा मृत्यू सर्वांनाच चटका लावून गेला आहे. गंभीर लक्षणे नसलेले रुग्ण माहिती लपवित असल्याने त्याची कीमत दुस-यांना मोजावी लागते आहे.