मराठी

पोलिस कर्मचा:याचा क्षुल्लक आजाराने मृत्यू

शहरात खळबळ

वरुड/दि. १९ – गेल्या अनेक दिवसांपासुन कोव्हिडमध्ये सेवा देत असतांना अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचा:यांना सुध्दा आपले प्राण गमवावे लागत आहे, अशातच वरुड पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत शिपाई अंकुश कोवे या ३० वर्षीय कर्मचा:याला सुध्दा गेल्या आठवडाभरापासुन ताप आणि सर्दी पडसा होता, त्याला नुकतेच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु आज त्याची प्राणज्योत मालवली. पोलिस चक्क कर्मचा:याचाच मृत्यू झाल्याने पोलिस अधिकारी आणि कर्मचा:यांमध्ये आता भितीचे वातावरण दिसुन येत आहे.
प्राप्त माहीतीनुसार, अंकुश कोवे हा वर्धा जिल्ह्यातील रहिवाशी होता. गेल्या काही दिवसांपासुन तो वरुड पोलिस स्टेशनमध्ये शिपाई पदावर कार्यरत आहेत. अत्यंत प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत वरिष्ठांनी दिलेल्या सुचना आणि आदेशाचे पालन करीत अंकुश हा वरुडमध्ये अत्यंत चांगली सेवा देत होता. गेल्या आठवडाभरापुर्वी त्याला अचानक ताप आला आणि त्यानंतर सर्दी पडसा सुध्दा जाण्वु लागला. ताप आल्यामुळे त्याला सर्वप्रथम वरुडच्या ग्रामिण रुग्णालयात व तेथून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरु असतांनाच त्याची प्राणज्यात मालवली.
एवढ्या उमद्या व्यक्तिमत्त्वाला गमावल्याने वरुड पोलिसांसह शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. विशेष म्हणजे अंकुश याचा काही वर्षांपुर्वीच विवाह झाला होता, त्याचे मागे पत्नी, १ मुलगा, आई, वडिल असा आप्तपरिवार आहे. अंकुशच्या अचानक निघून जाण्याने आम्हाला धक्का बसला असल्याचे ठाणेदार मगन मेहते यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button