मराठी

डॉक्टर उपलब्ध न झाल्याने ड्युटीवरील महिलेचा मृत्यू

चंद्रपूर:- चंद्रपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयात एका महिला कर्मचाराचा ड्युटीवर असताना मृत्यू झाला आहे. रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टर उपलब्ध न झाल्यामुळे या महिलेचा मृत्यू ओढावला. चार ऑगस्ट रोजी रात्री नवजात शिशुच्या अतिदक्षता विभागात कर्तव्यावर असताना संगीता पाटील नामक कंत्राटी सहायक महिला कर्मचारी जागेवर कोसळली. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते; परंतु संपूर्ण रात्रभर डॉक्टर्स उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे तिची तपासणी झाली नाही. अखेर तिचा मृत्यू झाला.

Back to top button