
पणजी/दि.१० – गोव्यातल्या एका कारखान्यात कर्मचारी झोपलेले असताना अमोनिया गॅसची गळती झाली. त्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला, तर चौघांची प्रकृती गंभीर आहे. दक्षिण गोव्यातल्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या सी-फूड प्रक्रिया उद्योगात ही घटना घडली आहे. चारही कामगारांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. सकाळी या कारखान्यात गॅस गळती सुरू झाली. त्या वेळी कामगार झोपेत होते. त्यांना अचानक त्रास व्हायला लागला. गॅस गळती झाल्याचे कळताच एकच धावपळ उडाली. यात एका कर्मचारयाचा मृत्यू झाला. ज्यांना जास्त त्रास होत होता, त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.