मराठी

क्षुल्लक आजाराने युवकाचा मृत्यू

मृत्यू झाल्यान गावामध्ये हळहळ

वरुड/दि.२९ – येथुन जवळच असलेल्या करजगांव (गांधीघर) येथील गणेश गजाननराव लांडगे या १९ वर्षीय युवकाचा अचानक मृत्यू झाल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
आज सकाळच्या सुमारास पोट दुखत असल्याची तक्रार वडिल गजाननराव यांचेकडे गणेश याने केली, त्यानंतर थुंकी गिळायला त्रास होत असल्याचे सांेिगतल्यानंतर लगेच त्याला वरुडला आणण्यात आले. सकाळची वेळ असल्यामुळे खाजगी रुग्णालयामध्ये त्याला उपचार मिळु शकला नाही अखेर त्याला ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी डॉ.चरण सोनारे यांनी त्याचेवर उपचार केला परंतु निदान होत नसल्याने व प्रकृती खालावत असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी त्याला अमरावतीला नेण्याची सूचना केली. विशेष म्हणजे त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि तोंडातून फेस येत होता, असेही डॉक्टरांनी सांगितले.
अमरावतीला नेत असतांना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. गणेश उर्फ गणु हा गावामध्ये अत्यंत सुस्वाभवी आणि आपल्या कामाशी प्रामाणिक असलेल्या युवक होता, अचानक त्याच्या निघून जाण्याचे गावात शोककळा पसरली आहे. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबत वृत्त लिहीस्तोवर कळु शकले नाही मात्र त्याला कोरोनोच कोणतेही लक्षण आढळून आले नाही, अशी माहीती त्याचेवर उपचार करणारे डॉ.चरण सोनारे यांनी दिली.
मृतक गणेश उर्फ गणु यांचे मागे आई, वडिल, बहिण, आजी, मोठे बाबा, मोठी आई आदी बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Related Articles

Back to top button