मराठी

पिकांचे पंचनामे करुन तात्काळ मदत जाहीर करा

क्रांती युवा गृपची जिल्हाधिकां:यांकडे मागणी

वरुड दी ३- तालुक्यातील सोयाबिनसह अन्य पिकांचे सर्वेक्षण व पंचनामे करुन तात्काळ शेतक:यांना आर्थिक मदत जाहीर करा, अशी मागणी करणारे निवेदन नुकतेच क्रांती युवा गृपच्या वतीने तहसिलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले.
या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, तालुक्यात यावर्षी सरासरी पाऊस चांगला झाला आहे. गेल्या ३ महिन्यापासुन सतत व संततधार पाऊस सुरु असुन पावसाने सरासरी टप्पा गाठला आहे. त्यामुळे शेतक:यांच्या चेह:यावर समाधान काही काळापुरतेच दिसले. ऑगष्ट महिन्याअखेर सातत्याने पाऊस झाल्याने शेतकरी मात्र चिंतातुुर झाला. सोयाबीनला खोड व तांबेरा या रोगाने ग्रासले. तसेच कपाशीच्या पात्यांमध्ये पाणी साचुन पात्या सडायला सुरुवात झाली. यावर्षी तालुक्यात अंबिया बहार संत्रा मोठ्या प्रमाणात असुन अगोदरच संत्र्याला भाव नसतांना संत्रागळ मात्र अतोनात होत आहे. त्यामुळे या सर्व संकटाची मालिका बघता शासन मात्र कुंभकर्णी झोप घेत आहे. अनेकवेळा विविध संघटनांनी मागणी करुनही अद्यापही तलाठ्यांना सर्वेक्षणाचे आदेश दिले गेले नाही. तेव्हा तालुक्यातील सोयाबीनसह अन्य पिकांचे पंचनामे करुन तात्काळ आर्थिक मदत जाहीर करा, अशी मागणी क्रांती युवा गृपने केली आहे.
यावेळी गृपचे समीर सरोदे, मनोज गेडाम, चंद्रशेखर अडलक, राहुल बारापात्रे, महेश बोरकुटे, शुभम लांडगे, शब्बु काझी, उमेश हिवरकर, शाम माळोदे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button