अमेरिकेला जाणा-या भारतीयांच्या संख्येत घट
वॉशिंग्टन/दि.१८ – ओपन डोर्सच्या अहवालानुसार, दहा लाखाहून अधिक परदेशी विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत आहेत, त्यापैकी सुमारे 20 टक्के भारतीय आहेत. इतकेच नाही, तर अमेरिकेत शिकणा-या परदेशी विद्यार्थ्यांपैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी भारत आणि चीनमधील आहेत. म्हणजेच, तिथे अभ्यास करणारा प्रत्येक परदेशी हा एकतर भारताचा आहे किंवा तो चीनचा; मात्र यानंतरही अमेरिकेला जाणा-या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत नऊ हजारांनी कमी झाली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला कोरोना जगात पसरू लागला, तेव्हा जगभरातील विद्यापीठांनी आभासी वर्ग सुरू केले. अनेक देशांनी फेब्रुवारीच्या सुरूवातीस आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घातली. अनेक देशांनी व्हिसावर बंदी घातली. त्याचा सर्वात वाईट परिणाम परदेशात शिकणा-या विद्यार्थ्यांवर झाला. ओपन डोअर्सच्या 2019-20 च्या अहवालात भारतातून अमेरिकेत जाणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या नंतरच्या काळात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, आयस्कूल कनेक्टच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे, की कोरोनानंतरही देशातील प्रत्येक 100 विद्यार्थ्यांपैकी 91 विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे.
आता या विद्यार्थ्यांना अमेरिका, कॅनडासारख्या देशांऐवजी न्यूझीलंड, आयर्लंड आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये शिक्षण घ्यायचे आहे. 2020 च्या सुरुवातीपासूनच परदेशात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ लागली होती. याचा परिणाम म्हणून जगातील विद्यापीठे ऑनलाइन शिक्षणाकडे वळली. तथापि, अनेक अभ्यासांमध्ये ऑनलाईन शिक्षणदेखील प्रभावी नाही. त्यामुळे आता महाविद्यालये, विद्यापीठे विद्यार्थ्यांनी पुन्हा कॅम्पसमध्ये यावेत आणि विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यास मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. .