मराठी

जीडीपीत साडेदहा टक्क्यांची घट?

कमकुवत आर्थिक स्थिती

मुंबई/दि. ८ – ‘फिच‘(FITCH) रेटिंग्जने मंगळवारी आर्थिक वर्ष २०२१ मधील भारताच्या जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादनाच्या) च्या नकारात्मक वाढीचा अंदाज आता दुप्पट केला आहे. सुरुवातीला पाच टक्के घट होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. सुधारित अंदाजानुसार आता ही घट १०.५ टक्के होईल, असे म्हटले आहे. ‘फिच‘ने या वर्षी जूनमध्ये पाच टक्क्यांच्या नकारात्मक वाढीचा अंदाज लावला होता. म्हणजे कोरोना आणि त्याच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जाहीर केलेल्या टाळेबंदीमुळे जीडीपीची वाढ उणे ५ टक्के होण्याचा अंदाज होता, तो वाढवून आता उणे१०.५ टक्के झाला आहे. फिच रेटिंग्जने आपल्या अहवालात असे म्हटले आहे, की मर्यादित वित्तीय समर्थन आणि कमकुवत आर्थिक व्यवस्थेमुळे आर्थिक क्रिया सामान्य झाली नाही. फिचच्या भारतीय युनिट इंडिया रेटिंग्जने मंगळवारी जाहीर केलेल्या अहवालात आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भारताचा जीडीपी ११.८ टक्क्यांनी घसरेल, असा अंदाज वर्तवून काळजीत आणखीच भर टाकली आहे.
यापूर्वी ५.३ टक्के घसरणीचा अंदाज होता. फिच आणि इंडिया रेqटगच्या ताज्या अंदाजानुसार ही आकडेवारी अलीकडच्या काळात सर्वांत कमकुवत आहे. भारताच्या इतिहासात प्रथमच जीडीपीत एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण झाली. यापूर्वी १९८० मध्ये जीडीपीतील घसरण ५.२ टक्क्यांची होती. आता त्यापेक्षा दुप्पट घसरण होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button