इम्यूनिटी क्लिनिक्स चा लोकार्पण
आयुष टास्क फोर्स आणि NIMA महाराष्ट्र शाखा यांच्या संयुक्त उपक्रम
अमरावती/दि.५ – अमरावती नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक (NAIC) चा ऑनलाईन लोकार्पण सोहळा अमरावती महानगरपालिकेचे महापौर चेतन गावंडे यांचे हस्ते पार पडला.
आयुष टास्क फोर्स कोव्हीड-19, महाराष्ट्र शासन आणि NIMA महाराष्ट्र शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात 500 च्या वर NIMA आयुर्वेद इम्यूनिटी क्लिनिकचे उदघाटन करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्र राज्यातील क्लिनिकचे लोकार्पण सोहळा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांच्या हस्ते तर दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते पार पडले. पुढील टप्प्यात राज्यभर एकुण 1000 च्या वर असे क्लिनिक्स आयुष टास्क फोर्स च्या संलग्नतेने महाराष्ट्र राज्य शाखेद्वारा सुरु करण्याचा मानस आहे. महाराष्ट्र राज्य शाखेचा मूळ प्रकल्पाला शासनाची साथ लाभल्यामुळे एक प्रोत्साहन मिळाले आहे.
कोव्हीड-19(COVID-19) आजारावर अजूनही 100% यशस्वी असा कुठलाही उपचार अजूनही उपलब्ध झाला नसून प्रत्येक व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती चांगली असल्यास हा रोग न होण्यास किंवा झाल्यास लवकर बरा होण्यास मदत होत असल्याचे जागतिक संशोधनातून सिद्ध झाले आहे आणि त्याच अनुषंगाने आपली रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यास आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे उपयोगी असल्याचे आणि त्यामुळे आपल्या या NIMA आयुर्वेद इम्युनिटी क्लीनिकचे महत्व अधोरेखित होत नसल्याचे महापौरांनी यावेळी बोलतांना म्हटले आहे. आज दिनांक 5 सप्टेंबर,2020 रोजी अमरावती शहरातील अद्याप 14 क्लिनिकचे ऑनलाईन उदघाटन अमरावती महानगरपालिकेचे महापौर चेतन गावंडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी एन.आय.एम.ए. अमरावती अध्यक्ष डॉ.स्वप्नील घाटोळ, सचिव डॉ.आशिष वानखडे, कोषाध्यक्ष डॉ.विजय खंडारे उपस्थित होते. सदर ऑनलाईन उदघाटनाला एन.आय.एम.ए., महाराष्ट्र राज्य शाखेचे उपाध्यक्ष डॉ.निळकंठ सोनटक्के, महाराष्ट्र राज्य शाखेचे सचिव डॉ.अनिल बाजारे, एम.सी.आय.एम. सदस्य डॉ.राजेश उताणे, माजी एम.सी.आय.एम. अध्यक्ष डॉ.दिनेश गवळी, विभागीय सचिव डॉ.धीरज इसोकार याशिवाय शहरातील अनेक डॉक्टर्स व नागरिकांनी ऑनलाईन उदघाटनाला उपस्थिती दर्शवली.
ही 14 क्लिनिक आयुर्वेद तज्ञांद्वारे चालवल्या जातील. या क्लिनिकचे उद्दीष्ट सर्व लोकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, व्याधीक्षमत्व (IMMUNITY) कमी असलेल्या लोकांची संपूर्ण प्रतिकार शक्ती सुधारणे आणि एसीम्प्टोमॅटिक,सौम्य आणि मध्यम रोगसूचक कोव्हीड-19 रुग्णांना मदत करणे आहे. हे इम्युनिटी क्लिनिक रोग प्रतिकार शक्ती वाढवून आरोग्यास सुरक्षित ठेवण्यास आणि प्रभावी मार्गाने समाजातील रोगाचा ओझे कमी करण्यास मदत करतील. एन.ए.आय.सी. क्लिनिक महाराष्ट्र शासनाद्वारे मान्यता प्राप्त असून आयुष कोव्हीड-19 टास्क फोर्सने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार क्लिनिक चालविली जातील.
अमरावती शहरात विविध भागात NAIC क्लिनिकच्या डॉक्टरचे नाव व पत्ता डॉ.स्वप्नील घाटोळ-आशियाड कॉलनी शेगाव रोड, डॉ.आशिष वानखडे- रंगोली लॉन समोर कठोरा रोड, डॉ.विजय खंडारे-महेंद्र कॉलनी, व्ही.एम.व्ही. मागे, डॉ.अनिल बाजारे-मुदलियार नगर, डॉ.विजय घाटोळे-रविनगर, डॉ.विजय अजमिरे-चपराशीपुरा, जेल रोड कॅम्प, डॉ.सुनील लांडे-कृषक कॉलनी, डॉ.किशोर उदापूरे-छत्री तलाव रोड, डॉ.सागर सांबे-यशोदा नगर नं.1, डॉ.निनाद हरणे-शेगाव नाका, डॉ.अंकुश मानकर-गजानन टाऊनशीप, डॉ.ओमप्रकाश शर्मा-भुतेश्वर चौक, डॉ.प्रिती केडिया-अकोली रोड, डॉ.वैभव माहोरे-साईनगर.