मराठी

ठाकरे सरकारची ट्वीटरवर बदनामी

मोठ्या षडयंत्राचा होणार भांडाफोड

मुंबई/दि.३  – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्र शासन, मुंबई पोलीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदनामीसाठी विशिष्ट हॅशटॅगद्वारे बोगस ट्वीटर अकाउंटवरून विशेष मोहीम चालविण्यात आल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. यासाठी ट्वीटरवर सुमारे दीड लाख अकाउंट्स उघडण्यात आली असून भारताप्रमाणेच चीन, नेपाळ, हाँगकाँगमधून लाखो ट्वीटस, रीट्वीट करण्यात आले. विशेष म्हणजे एकाचे वेळी 500 ट्विट करण्यासाठी बॉट या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राज्यापासून देश पातळीवर राजकारण तापले असतानाच सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात नकारात्मक ट्वीट आणि त्यापेक्षा अधिक रीट्वीट केले जाऊ लागले. यामध्ये काही षडयंत्र असल्याचा संशय आल्याने मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू केला. या तपासामध्ये आतापर्यंत ट्वीटरवरील तब्बल दीड लाख अकाउंट बनावट असल्याचे उघड झाले आहे. एकावेळी 500 ट्वीट आणि एका महिन्यात 5 लाख ट्वीट करण्यासाठी किंवा रीट्वीट करण्यासाठी क्चह्रञ्ज या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. एखादे विशिष्ट हॅशटॅग टाकून या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नकारात्मक किंवा सकारात्मक कमेंट्स अपलोड करता येतात. एका वेळी 500 ट्वीट केल्यामुळे आतापर्यंत अशा प्रकारचे कोट्यवधी ट्वीट आणि रीट्वीट केले गेले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
क्चह्रञ्ज या सॉफ्टवेअरचा वापर करून परदेशाप्रमाणेच देशातूनही बदनामीकारक ट्वीट करण्यात आल्याचे उघड झाले आहे. ओळख लपविण्यासाठी प्रॉक्सी सव्र्हरचा वापर करण्यात आला आहे. आयपी अॅड्रेसवरून हे ट्वीट कुठून करण्यात आले आणि यामागे कोण आहे याचे धागेदोरे हाती लागल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. त्यामुळे यामागील आरोपी अटकेत आल्यास मोठ्या षडयंत्राचा भांडाफोड होण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या नावाने आक्षेपार्ह हॅशटॅग वापरून बदनामीकारक ट्वीटची अखंड मालिकाच लावण्यात आल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या सर्व हॅशटॅगचा व निगेटिव्ह सेंटीमेंटचा तपशीलच जारी केला आहे.

Related Articles

Back to top button