मराठी

हिरव्या मिरचीला विदेशात मागणी वाढली

यावर्षी मिरचीचा पेरा कमी असल्यामुळे उत्पादनही कमी होणार

वरुड/दि. ९ – देशभरातील नागरिकांना हिरव्या मिरचीचा तडक्याचा आस्वाद देणारे तालुक्यातील राजुरा बाजार येथील हिरवी मिरची मार्केट आता फुलायला सुरुवात झाली असून उच्चांकी बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी सुखावला आहे. हजारो हातांना काम देणारे हे मार्केट सुरु झाल्याने काही प्रमाणात बेरोजगारीची समस्याही निकाली निघाली आहे.
संत्रा शेतीसोबत मिरचीही फुलली
संत्रा उत्पादक बेल्ट म्हणून ओळखल्या जाणा:या या परिसरात हळूहळू शेतकरी मिरची उत्पादनाकडे वळते झाले. कालांतराने हिरवी मिरचीचे मुबलक उत्पादन होत असल्याने मिरची विक्री व खरेदीच्या सोयीसाठी राजुरा बाजार येथे कृषी उत्पन्न बाजार समितीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हिरवी मिरची मार्केट सुरु केले. दिवसेंदिवस हिरव्या मिरचीचे उत्पादन वाढू लागल्याने परप्रांतातील व्यापारीही येथे खरेदीसाठी येऊ लागले व पाहता पाहता हे मिरची मार्केट देशासह परदेशातही हिरवी मिरची निर्मात करणारी एक प्रसिद्ध बाजारपेठ ठरले.
दरवर्षी पोळयाच्या सनानंतर सुरु होणारे हे मार्केट गेल्या २६ ऑगष्ट पासून हळूहळू सुरु झाले असून आतापर्यंत ९ व्यापा:यांनी खरेदी सुरु केली आहे. गेल्या १० दिवसात या मिरची मार्केटमध्ये आतापर्यंत १७८ टन हिरव्या मिरचीची आवक झाली आहे. यावर्षी सुरवातीपासूनच शेतक:यांना चांगला बाजारभाव मिळत ४-५ हजाराचा उच्चांकी बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी सुखावला आहे.
बाजारभाव उच्चांकी पण पेरा घटला
गेल्या काही वर्षात मिरचीवर येणारे विषाणूजन्य व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव बळावल्याने शेतक:यांनी मिरचीवर केलेला हजारो रुपयाचा खर्च वाया गेला. त्यामुळे गेल्या ५ वर्षात मिरचीचे उत्पादनच होत नसल्याने हा बाजार कोमेजला होता. तसेच यावर्षी कोरोनामुळे या बाजारावर विपरीत परिणाम होईल, अशी धारणा काही शेतक:यांची झाल्याने यावर्षी शेतक:यांनी मिरचीचा पेरा घटविल्याचे दिसून येते. मागील वर्षी ३७२७९.२१ क्विंटल मिरचीची आवक येथे झाली होती तर ४७८ हेक्टरवर शेतक:यांनी मिरचीची लागवड केली होती. यावर्षी ही लागवड १६३ हेक्टरवर राहील असा अंदाज कृषी विभागाच्या नियोजनातून दिसून येतो.
बेरोजगारांच्या हाताला मिळाले काम
या मिरची बाजाराच्या उलाढालीवर अनेकांच्या संसारास हातभार लागतो. हॉटेल, हमाल, मजूर, वाहतूक करणारे वाहनचालक, किरकोळ दुकानदार, व्यापारी, रोजंदारीवरील बाजार समितीचे कर्मचारी या सर्वांच्या हाताला काम मिळाले आहे. त्यामुळे बेरोजगारीची समस्याही निकाली निघाली आहे.
रात्रकालीन बाजार, देशभरात निर्यात
दिल्ली कानपुर, गोरखपूर, कानपुर, कोलकाता, मुंबई, अशा देशातील मोठया बाजारपेठेत येथील मिरची पाठविली जाते. या बाजारत नागपूर जिल्यातील काटोल, वर्धा जिल्ह्यातील आष्टी, कारंजा, घाडगे, तसेच जिल्ह्यातील मोर्शी चांदूरबाजार पासून शेतकरी मिरची विक्रीसाठी आणतात. हा बाजार रात्रकालीन आहे दिवसभर शेतीतील मिरची तोडल्यानंतर सायंकाळी शेतकरी मिरची विक्रीसाठी आणतात. ऐन भरात हा बाजार रात्रभर चालतो. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिपत्याखाली येणारे हे मार्केट पारदर्शी व्यवहारासाठी प्रसिद्ध आहे. मिरची मोजल्यानंतर लगेच नगदी चुकारा शेतक:यांना देण्यात येतो हे येथील वैशिष्टय आहे. सध्या कलकत्ता, दिल्ली येथे ही मिरची जात असुन तेथुन बांगलादेश पर्यंत निर्यात केली जात आहे

Related Articles

Back to top button