मराठी

मोर्शी तालुक्यातील ३४ कोटी ३५ लक्ष २४ हजार २०० रुपये अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी

राष्ट्रवादी काँगेस पक्षाची तहसिलदार डॉ सिद्धार्थ मोरे यांच्याकडे मागणी

  • मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे  मानले आभार

मोर्शी दि २ – मोर्शी तालुक्यामध्ये डिसेंबर २०१९ ,जानेवारी २०२० मध्ये  मोठ्या प्रमाणात गारपीट व अवकाळी पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते गारपिटीमुळे संत्रा शेतीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे मोर्शी तालुक्यतील संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता  तेव्हा आमदार देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
आमदार देवेंद्र भुयार यांनी सप्टेंबर डिसेंबर २०१९ जानेवारी २०२० या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, मुळे झालेल्या शेती पिकांचे फळ बागांच्या  झालेल्या नुकसानीची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबतचा आढावा बैठक घेऊन शेतकरी बांधवांच्या या मागणीकडे विशेष लक्ष घालून  राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची गळ घातली असता मदत पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांना तात्काळ कार्यवाही बाबतचे आदेश देण्यात आले. त्यानुसार वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची रक्कम उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये मोर्शी तालुक्यासाठी ३४ कोटी ३५ लक्ष २४ हजार २०० रुपये इतकी नुकसान भरपाई मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शासनाने आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ ३४ कोटी ३५  लक्ष २४ हजार २०० रुपयांची मदत उपलब्ध करून शेतकऱ्यांना आधार दिला आहे . आमदार देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ मदत फक्त १० महिन्यामध्ये  उपलब्ध करून दिली यामध्ये मोर्शी  तालुक्यातील ३७९६० शेतकऱ्यांचे ४०५४० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना ३४ कोटी ३५ लक्ष २४ हजार २०० रुपये मदत आमदार देवेंद्र भुयार यांच्या अथक परिश्रमामुळे प्राप्त झाले असून मोर्शी तालुक्याला आवश्यक असलेली संपूर्ण रक्कम उपलब्ध करून दिली त्याबद्दल आमदार देवेंद्र भुयार यांचे राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, उमेश गुडधे, राष्ट्रवादी युवक काँगेसचे उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी आभार व्यक्त केले.
मोर्शी तालुक्यात गारपीट मुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान तसेच अवेळी पावासामुळे झालेल्या नुकसानी ३४ कोटी ३५ लक्ष २४ हजार २०० रुपये अनुदान वाटप करण्यात वेळ लागत असल्यामुळे राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रकाश विघे, उमेश गुडधे, राष्ट्रवादी युवक काँगेस पक्षाचे उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी तहसीलदार डॉ सिद्धार्थ मोरे यांच्याकडे नुकसान भरपाईची मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली असून तहसीलदार डॉ सिद्धार्थ मोरे यांनी सर्वच बँक व्यवस्थापकांना आपले शाखेमधील असलेले खातेदार यांची नुकसाणीचे रकमेचे धनादेश शेतकऱ्यांच्या यादीसह देण्यात आले असुन नुकसानग्रस्त शेतकरी यांची रक्कम प्रलंबीत न ठेवता तात्काळ यादीनुसार लाभार्थी यांचे खात्यामध्ये तात्काळ जमा करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले . त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा होणार आहे.

Related Articles

Back to top button