मराठी

वरुड मोर्शी तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची चौकशी करण्याची मागणी.

वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांची आमदार देवेंद्र यांच्याकडे तक्रार

  • जलयुक्त शिवार योजनेतून शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करूनही ड्रायझोनचा कलंक मिटता मिटेना

वरुड दि १९ – शेतकऱ्यांसाठी सिंचन क्षेत्रात वाढ करुन सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे,शेतीसाठी संरक्षित पाणी साठा निर्माण करणे, भूगर्भातील पाणी पातळी वाढविणे,लोकसहभागातून गाळ काढून पाणी साठा वाढविणे, जलस्रोतांची साठवण क्षमता वाढविणे तसेच पावसाचे पाणी गावशिवारातच अडविणे हे जलयुक्त शिवार योजनेचे उद्दिष्ट होते. या उद्देशपुर्तीसाठी अभियान यशस्वी करण्यावर भर देण्याचा कटाक्ष होता.असे असतानाही ही योजना वरुड मोर्शी  तालुक्यात सपशेल अपयशी ठरलेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
वरुड मोर्शी तालुक्यात मागील ५ वर्षाच्या काळामध्ये  जलसंधारणाच्या कामावर शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करूनही वरुड मोर्शी तालुक्याला लागलेला ड्रायझोन चा कलंक मिटू शकला नाही , वरुड मोर्शी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेद्वारे शासनाने  जलसंधारनाची कामे मोठ्या प्रमाणात केली असल्याचा वाजागाजा करण्यात आला म्हणून जलयुक्त शिवार योजनेकडे मोठ्या आशेने पाहिले जाते. कोरड्या दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाचे वतीने वरुड मोर्शी तालुक्यातील गावाचा समावेश जलयुक्त शिवार योजनेसाठी करण्यात आला. परंतु जलयुक्त शिवारातून पाण्याच्या नैसर्गिक साठय़ांचे बळकटीकरण करण्याचा पुरेपूर  प्रयत्न झालेला दिसत नाही . वरुड मोर्शी तालुक्यात शासनाने तयार केलेले सिमेंट प्लग बंधारे जलयुक्त शिवार योजनेमधून शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे जीर्णावस्थेत असून ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे , त्या शेकडो सिमेंट प्लग बंधाऱ्याच्या दुरुस्तीकरिता वरुड मोर्शी तालुक्यात निधी उपलब्ध झाला नसल्याची शोकांतिका आहे . त्या सिमेंट प्लग बंधाऱ्यचे खोलीकरण त्याची दुरुस्ती जल युक्त शिवार योजनेच्या माध्यमातून  केल्यास त्या बंधाऱ्याच्या माध्यमातून वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होऊन त्याचा फायदा हजारो शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला असता .  त्या दिशेने जल युक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे केली असती तर जलसंसाधनाची मोठी कामे वरुड मोर्शी तालुक्यातील गावांमध्ये होऊन काही प्रमाणात का होईना पाण्याच्या समस्येवर मात करता आली असती .
जल युक्त शिवार योजनेतील  रखडलेली व नवीन मंजूर होणारी कामे चांगल्या पद्धतीने पूर्ण करणे गरजेचे होते . सिमेंट प्लग बंधारे दुरुस्ती करणे , खोलीकरण करणे , गाळ काढणे, वरुड मोर्शी तालुक्यातील सिंचन प्रकल्पांचे अपूर्ण कामे इत्यादी  कामांना १० वर्षाच्या काळामध्ये उशिर का झाला , याचा जाब शासन प्रशासनाला विचारण्याची व त्यासाठी कठोर भुमिका घेण्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे . मागील १० वर्षांपासून वरुड मोर्शी तालुक्यातील सिंचन प्रकल्पांची  कामे थंडबस्त्यात पडली आहे .
जल युक्त शिवार योजनेच्या माध्यमातून वरुड मोर्शी  तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल व सिंचनाच्या सोई उपलब्ध होईल अशी कोणतीही उपाय योजना होतांना दिसली नसल्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नसल्याचा आरोप मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकरी करत आहे.  भीषण दुष्काळात वरुड मोर्शी तालुक्यातील लाखो संत्रा झाडे वाळली त्यामध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले .  जल युक्त शिवार योजनेच्या नावावर वरुड मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची चर्चा आता गावा गावा मध्ये रंगतांना दिसत आहे . जल युक्त शिवार योजनेच्या भ्रष्टाचाराचा फटका वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला असल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला.   जल युक्त शिवार योजनेच्या माध्यमातून झालेल्या तलाव, खोलीकरण,  सिमेंट प्लग बंधारे , शेततळे यासह आदी झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची तपासणी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडे केली आहे . वरुड मोर्शी तालुक्यात जल युक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे झाली असल्याचा मोठा वाजागाजा करण्यात आला मात्र प्रत्यक्षात शेतातील विहिरी बरोबर गावातील विहिरीची लेवल खालावत आहे .  वरुड मोर्शी तालुक्यात जल युक्त शिवार योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात  भ्रष्टाचार झाल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात जलसंधारणाची कामे योग्य पद्धतीने झाली नसल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने  घटत आहे  नैसर्गिक जलस्त्रोतांवर त्याचा परिणाम जाणवत आहे. मोर्शी तालुक्यातील शेतातील विहिरी कोरड्या पडत आहेत. शेतकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येण्याची चिन्हे दिसत आहे .  जल युक्त शिवार योजनेच्या माध्यमातून त्यावर कोट्यावधी रुपये खर्च करून जलसंसाधनाची योग्य कामे न झाल्यामुळे परिस्थिती गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे.
मोर्शी वरुड तालुक्यात जल युक्त शिवार योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिक करत असून भ्रष्टाचारामुळे वरुड मोर्शी तालुक्यात सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असून वरुड मोर्शी तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या जलयुक्त शिवरच्या कामाच्या गुणवत्तेची तपासणी व झालेल्याकामांची चौकशी करण्याची मागणी मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडे केली आहे.
जलयुक्त शिवार अभियान योजना नेमकी कोणासाठी होती? राज्यभरात या योजनेचं निव्वळ कंत्राटीकरणच झालं. योजना राबवताना प्रशासन आणि कंत्राटदार यांच्याच हाती सगळी सूत्रं होती. शिवाय शेकडो गावं दुष्काळमुक्त केल्याचा दावा फोल असल्याचा आरोप आमदार देवेंद्र भुयार यांनी केला.

Related Articles

Back to top button