मराठी

संत्रासाठी ऑरेंज रेल्वे सुरू करण्याची मागणी ! 

संत्रा आयात निर्यातीच्या धोरणावर आमदार देवेंद्र भुयार यांची मंत्रालयात बैठक

वरुड/दि. ३ – मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासनाने कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या प्रमुख उपस्थितीत संत्रा फळा बाबत ध्येय आणि धोरणे ठरविण्या करीता सोबत केंदीय रेल्वे विभाग ,फलोत्पादन विभाग,पणन विभाग याह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आयात निर्यात बाबत लॉकडाऊन काळात संत्रा परराज्यात तसेच विदेशात निर्यात व्हावा व देशातील विविध ठिकाणी, मॉल मध्ये संत्रा ला बाजारपेठ मिळावी, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विदेशामध्ये बाजारपेठ उपलब्ध करून देण्याकरिता आमदार देवेंद्र भुयार व राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्वाच्या अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक पार पडली.
  या बैठकीमध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच त्यांचा माल थेट बांगलादेश बरोबर इतर आशियायी देश्यामध्ये सुद्धा संत्रा निर्यात करण्याबाबत ध्येयधोरण नीच्छित करण्यात येईल व बांगलादेशमध्ये कमी वेळात संत्रा पाठविता यावा यासाठी अमरावती, चांदुर बाजार,  मोर्शी , वरुड येथून थेट बांगलादेशमध्ये संत्रा नेता यावा यासाठी  विशेष ‘ऑरेंज रेल’ तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बांगलादेश ही मोठी बाजारपेठ मानण्यात येते. दरवर्षी सुमारे अडीच लाख टन संत्री बांगलादेशमध्ये निर्यात करण्यात येतात. विदर्भातून बांगलादेशपर्यंत मालवाहतूक करण्यासाठी साधारणत: ७२ तास लागतात. तर रेल्वेमार्गाने हेच अंतर ३६ तासात पार करता येणे शक्य आहे. जर माल लवकर पोहोचला तर त्याची गुणवत्ता कायम राहील व वाहतुकीचा खर्चदेखील कमी होईल अशी भूमिका यावेळी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मांडली .
      अमरावती जिल्ह्यातील मोर्शी-वरुड हा भाग विदर्भाचा कॅलिफोर्निया या नावाने प्रचीलीत आहे. परंतु यावर्षी  आंबिया बहाराच्या झालेल्या संत्र्याच्या  उत्पादनामुळे व संत्र्याला पाहिजे त्या प्रमाणात  नसलेल्या मागणीमुळे संत्रा उत्पादित शेतकरी हवालदिल झाला, सुरवातीपासूनच संत्र्याला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, संत्र्याला शासनाने संरक्षण देणे, त्यासोबतच जाहिरात व प्रक्रियेच्या माध्यमातून संत्र्याला चांगल्या प्रतीचे मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी त्यासोबतच संत्र्याला “राजाश्रय” मिळवून देणे या दृष्टीने मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी संत्रा धोरणाविषयी बोलतांना संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून त्यांना दिलासा देण्याची मागणी केली.
     संत्रा उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेऊन येत्या काळात त्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलण्याची मागणी करून संत्रा निर्यातीत येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करून संत्रा उत्पादकांसाठी आवश्‍यक त्या प्रयोगशाळांची उभारणी करून सिट्रस इस्टेटचा प्रश्‍नही लवकरच मार्गी लवावा अश्या सूचना आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केल्या .

Related Articles

Back to top button