जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने
जिल्हाधिकार्य्यासह आयुक्तांना निवेदन आयटक, सीटूच्या नेतृत्वातील आशा, गटप्रवर्तकांनी केला शासनाचा निषेध
अमरावती प्रतिनिधी/ ९ ऑगस्ट -राष्ट्रीय आरोग्य अ भियान अंतर्गत कामकरणार्या अशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिलांना कंत्राटी कर्मचारि यांचाहि दर्जा नाही. किमान वेतन, सामाजिक सुरक्षाही नाही. त्यामुळे अशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचारि यांचा दर्जा द्या, या प्रमुख मुद्यासह इतर मागण्यांसाठी आयटक व सीटुच्या नेतृत्वातील महिलांनी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करीत संबंधित अधिकाèयांना निवेदने सादर केली. आयटकने जिल्हा सामान्य रूग्णालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केल्यानंतर जिल्हाधिकार्य्याना निवेदन दिले. तर सीटूच्या नेतृत्वातील महिलांनी मनपा मुख्यालय आणि वनिता समाज समोर निदर्शने करीत आयुक्तांना निवेदन सादर केले. केंद्र सरकारच्या कामगाराविरोधी धोरणाविरोधात आयटकच्या वतीने प्रारंभी जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या प्रवेशव्दारासमोर निषेध नोंदविण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या कामगार कायद्यातील बदलाला विरोध करण्यात आला तसेच कोरोनाच्या काळात काम करूनही आशा व गटप्रवर्तक महिलांना कंत्राटी कर्मचारि यांचा दर्जा दिला जात नाही , असे म्हणत शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. नियमित स्वरूपाचे वेतन अथवा मानधनही आशांना मिळत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. कोणत्याही साथीच्या रोगाचा सव्र्हे हा अशा वर्कर्सलाच करावा लागतो. कोविड १९ मध्येही अशा वर्कर्सचे काम महत्वाचे आहे. परंतू या सर्व कामाबद्दल सरासरी अडीच ते तीन हजार रूपये महिना या आशा वर्कर्सला मिळतो. दहा वर्ष काम करूनही या आशा वर्कर्सला मिळणारी रक्कम ही अल्प आहे. त्यामुळे सरासरी कर्मचाèयांचा दर्जा द्या, किमान १८ हजार रूपये वेतन द्या, गटप्रवर्तकांना इतर कंत्राटी कर्मचायांप्रमाणे वेतन व भत्ते द्या, कोविडमध्ये काम करत असल्याने प्रोत्साहनपर तीनशे रूपये दैनंदिन भत्ता द्या, इतर कंत्राटी कर्मचायांप्रमाणेच पगारी प्रसूती रजा व इतरही सुविधा द्या आदी मागण्या यावेळी रेटण्यात आल्या. यावेळी जिल्हाकचेरीत आयटकचे प्रफुल्ल देशमुख, प्रतीभा मकेश्वर, साधना तायडे, विद्या रामटेके, आशा गायगोले, वंदना गडqलग, वर्षा आडोळे, माला वर्हाडे , किरण उगले, जोत्सना राउत तर मनपामध्ये सीटूचे डॉ. सुभाष पांडे यांच्यासह इतर आशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिला उपस्थित होत्या.
आश्वासनानंतरही मिळाला नाही प्रोत्साहन भत्ता महापालिकेने गेल्या बजेटमध्ये वाढीव माधनाची तरतुद केल्याचे म्हटले होते. शिवाय कोरोनाच्या काळात आशा वर्कर्सला प्रतिदिन १०० रूपये अतिरिक्त भत्ता देण्याचीही मागणी मे महिन्यातच मंजूर करण्यात आली होती. परंतु अद्याप या दोन्ही मुद्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही. मनपा क्षेत्रातील विविध १३ आरोग्य केंद्रांतर्गत आशा वर्कर्स काम करीत आहेत. त्यापैकी काहींना अद्यापही ओळखपत्रेही देण्यात आली नाहीत. त्यामुळे नव्या आशा वर्कर्स धास्तावल्या आहेत. सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड वंदना बुरांडे यांनी या संदर्भात आयुक्तांना एक स्वतंत्र निवेदनही दिले आहे.