टीआरपी घोटाळाप्रकरणी पाच चॅनेलच्या खात्यांचा मागविला तपशील
मुंबई/दि.२३ – टीआरपी घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांच इंटेलिजेंस युनिटने आतापर्यंत पाच चॅनलविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या सर्व चॅनलला पाच वर्षांच्या खात्यांचा तपशील मागवण्यात आला आहे. क्राइम ब्रांचच्या एका अधिका -याने सांगितले, की या चॅनेलच्या खात्यांच्या तपासात आर्थिक अनियमितता आढळली आहे. या सर्व वाहिन्यांचे मालक आणि त्यांचे वित्त विभाग यांना गेल्या पाच वर्षांच्या खात्यांची माहिती देण्यास सांगितले आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ लोकांना अटक करण्यात आली आहे. आठ ऑक्टोबर रोजी मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत बनावट टीआरपी प्रकरण उघडकीस आणले. त्या वेळी तीन वाहिन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाचा समावेश होता. या प्रकरणात अटक केलेले आरोपी विश्वकर्मा आणि रामजी वर्मा यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत आणखी दोन वाहिन्यांची नावे समोर आली आहेत; मात्र पोलिसांनी त्यांची नावे उघड केली नाहीत. त्यात एक न्यूज चॅनेल आणि म्युझिक चॅनेलचा समावेश आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन वाहिन्यांच्या संचालकांना अटक केली आहे. त्याच वेळी रिपब्लिक टीव्हीच्या सहाहून अधिक लोकांची चौकशी केली गेली आहे. २४ ऑक्टोबर रोजी चॅनेलचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. रिपब्लिक टीव्हीचे वितरण प्रमुख घनश्याम qसह आणि कार्यकारी संपादक निरंजन स्वामीची चौकशी करण्यात आली. हंसा या संस्थेच्या काहींवर गुन्हे दाखल केले. गेल्या वेळी चौकशीमध्ये निरंजन स्वामी यांच्याकडे हंसाचा तो अहवाल मागविण्यात आला.