मराठी
वनविभागाच्या राजकारणात अडकला जनक नगरी चा विकास-गुरुदेव संघात आरोप
वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर मडावी यांचे निलंबन करा
-
गुरुदेव संघाची मागणी
-
उपवनसंरक्षक कार्यालयात गुरुदेव संघाची धडक
यवतमाळ दि १८ : शहराला लागून जनक नगरी येथे वनविभागाच्या हद्दीत नाला आहे, या नाल्यातील घाण पाणी हे जनक नगरी हरिओम नगर येथील नागरिकांच्या घरात शिरत असून याबाबत वारंवार वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) शंकर मडावी यांना निवेदन दिले असता हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे, वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर मडावी यांचे तात्काळ निलंबन करा अशा मागणीचे निवेदन गुरुदेव युवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह व उपवनसंरक्षक बावळे यांना देण्यात आले,यावेळी गुरुदेव संघाच्यावतीने उपवनसंरक्षक बावळे यांच्या कार्यालयात मोर्चा सुद्धा देण्यात आला
जनक नगरी हरिओम नगर येथील नागरिक वीस वर्षांपासून येथे वास्तव्य असून आजपर्यंत येथील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या नाही, त्यातच वनविभागाच्या हद्दीत एक मोठा नाला आहे ह्या नाल्यात पावसाचे पाणी आल्यावर हा नाला तुडूंब भरतो, या नाल्याचे संपूर्ण घाण पाणी येथील नागरिकांच्या घरात शिरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, अनेकांचे घाण पाण्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू व घरातील धान्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न सुद्धा मनोज गेडाम यांनी केला आहे, याबाबत वारंवार वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) शंकर मडावी यांना निवेदन दिल्यानंतरही हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे असा आरोप सुद्धा यावेळी मनोज गेडाम यांनी केला आहे, शंकर मडावी हे यापूर्वी सामाजिक वनीकरण विभाग कमालीचे वादग्रस्त ठरले होते, 33 कोटी व 50 कोटी वृक्ष लागवड ही त्यांनी कागदावरच केल्याचा आरोप गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे, नंतर शंकर मडावी यांनी आपल्या जवळच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून सोन्याची अंडी देणारी कोंबडी जोडमोहा येथील प्रादेशिक वन विभागाचा कारभार हाती घेतला, वसुली अधिकारी म्हणून शंकर मडावी यांची ओळख वनविभागात आहे, असा आरोप सुद्धा यावेळी मनोज गेडाम यांनी केला आहे, शंकर मडावी यांच्याकडे जोडमोहा व्यतिरिक्त यवतमाळ प्रादेशिकचा सुद्धा चार्ज आहे, आता आम्ही शांत बसणार नसल्याचे यावेळी मनोज गेडाम यांनी सांगितले आहे, जनक नगरी हरिओम नगर येथील नागरिकांना गुरुदेव संघाच्या वतीने आपण न्याय मिळवून देऊ असे म्हणून गेडाम यांनी सांगितले आहे,वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची भोंगळ कारभाराचे निवेदन जिल्हाधिकारी एम देवेन्द्र सिंह व उपवनसंरक्षक बावळे यांना देण्यात आले आहे, वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर मडावी यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे, यावेळी गुरुदेव युवा संघाच्या वतीने उपवनसंरक्षक कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला होता,यावेळी जनक नगरी हरिओम नगर येथील वनविभागाच्या हद्दीत असलेला नाला त्वरित बंद करा व शंकर मडावी यांचे निलंबन करा असे जोरात नारेबाजी करण्यात आली