वरुड/दि. २९ – धनगर समाजाला अनुसुचित जमाती या प्रवर्गामधील सवलती मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन राजमाता अहिल्या ब्रिगेडच्या वतीने नुकतेच देण्यात आले आहे.
या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, भारतीय राज्यघटनेनुसार धनगर समाजाचा ३६ व्या क्रमांकावर अनुसुचित जमाजीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य प्राप्तीपासुन अनुसुचित जमीातीमध्ये धनगर समाजाचा समावेश केला आहे. असे नमुद असुन सुद्धा महाराष्ट्र शासनाने आम्हा धनगर बांधवांना अनुसुचित जमातीच्या सवलती पासुन वंचित ठेवले आहे.
या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ब:याच समाजाच्या घटना दुरुस्ती करुन अनुसुचित जमातीच्या यादीमध्ये स्थान मिळाले आहे; परंतु धनगर समाजाला राज्यघटनेमध्ये ३६ व्या क्रमांकावर समावेश असुन सुद्धा अनुसुचित जमातीचा लाभ घेण्यापासुन वंचित ठेवण्यात आले आहे. तरी आम्हाला आमच्या घटनेमध्ये असलेल्या अधिकार शासनाने मान्य करावा, अशी मागणी राजमाता अहिल्या ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीनेअहिल्या ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रकाश हंबर्डे, दिलीप नवले, आर.एम.खरात, अनिल थोटे, सुरज पाटणकर, सागर नवले, मयुर माहुलकर, कमलाकर शेकार, विक्की कानडे आदींनी केली आहे.