मराठी

डिजिटल व्हिलेजमधून 20 लाख रोजगारनिर्मिती

1000 दिवसांत 4.5 लाख गावांत होणार कायापालट!

नई दिल्ली/दि.२२– भारतात पुढील 1000 दिवसांनंतर या गावांतील युवकापासून ते महिलांपर्यंत अनेकांसाठी एक नवीन संधी चालून येणार आहे. डिजिटल व्हिलेज या योजनेतून जवळपास 20 लाख लोकांसाठी नवीन नोकरीची संधी निर्माण होणार आहे. विशेष बाब म्हणजे ही नोकरी गावातच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे युवकांना आता नोकरीसाठी गाव सोडावं लागणार नाही. 1000 दिवसांनंतर गावातील लोकांनाही कामासाठी शहरात जाऊन सरकारी कार्यालयाचे उंबरठे घासावे लागणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला घोषणा केली होती की, पुढील 1000 दिवसांत उर्वरित सर्व गावांत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचं काम पूर्ण होणार आहे. आतापर्यंत 1.5 लाख गावांत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचं काम पूर्ण झालं आहे. आता उर्वरीत 4.5 लाख गावांना ऑप्टिकल फायबर केबलशी जोडण्याचं काम सुरू आहे. आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाच्या (Electronics ministries) अत्यारिखाली काम करणाऱ्या कॉमन सर्वि्हस सेंटर ( सीएससी)चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश त्यागी यांनी सांगितले की या गावांमध्ये ऑप्टिकल फायबर आल्यानंतर प्रत्येक गावात एक-एक कॉमन सर्वि्हस सेंटर उघडण्यात येईल. या सेंटरमुळे गावातील कमीत कमी पाच जणांना नोकरी मिळेल आणि असाच हिशोब लावला, तर जवळपास 20 लाख लोकांना रोजगार मिळेल. सीएससीमध्ये शिक्षणासह उपचारापर्यंतच्या सुविधा गावकऱ्यांना मिळेल आणि त्यांना आता शहरात जावे लागणार नाही. प्रत्येक गावात एक-एक स्थानिक स्थरावर इंटरप्रेन्योरची निवड केली जाईल, जो शेतकऱ्यांचा शेतातला माल विकण्याची सोय करेल. बँकिंगची सुविधाही गावात निर्माण होईल. 4.5 गावांपैकी महाराष्ट्रातील गावांची संख्या किती आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण, या योजनेनं महाराष्ट्रातील युवकांनाही संधी निर्माण होणार आहे.
आतापर्यंत 796 गावं जलद इंटरनेटशी जोडली गेली आहेत.103 गावांसह उत्तर प्रदेश अव्वल क्रमांकावर आहे. 53 गावांसह मध्यप्रदेश तिसऱ्या स्थानी आहे. 45-45 डिजिटल व्हिलेजसह महाराष्ट्र व छत्तीसगड तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 39 आणि 27 गावांसह बिहार आणि झारखंड अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत.

Related Articles

Back to top button