मराठी

चर्चेचे नाटक, घुसरखोरीची तयारी

चीनच्या सैन्यचे पॅन्गाँग सरोवराजवळ घुसखोरी

बीजिंग/दि. ३१ –  एका बाजूला चर्चेचे नाटक करताना दुसरीकडे चीनच्या सैन्याने पॅन्गाँग सरोवराजवळ घुसखोरी करण्याची तयारी दोन महिन्यांपासून केली होती, असे स्पष्ट झाले आहे. उपग्रह चित्रावरून हे उघड झाले आहे. ‘ओपन सोर्स इंटेलिजेन्स एनालिस्ट‘ ने दोन महिन्यांपूर्वी चिनी(CHINA) सैन्याच्या हालचाली टिपणारे सॅटेलाइट इमेज प्रसिद्ध केले होते. पॅन्गाँग सरोवराच्या दक्षिण किनारयावर चीनने आपल्या काही चौक्या उभारल्या होत्या. याच ठिकाणाजवळ भारत-चीनच्या सैन्यामध्ये संघर्ष झाला आहे. पॅन्गाँग सरोवराच्या दक्षिण भागात फक्त चिनी सैन्य तैनात नव्हते, तर त्यांच्या मदतीसाठी मोठ्या संख्येने आणखीही सैन्याची कुमक या भागात होती. या भागात चीनने काही नवीन कॅम्प आणि रस्ते बांधले. इतकेच नव्हे तर चर्चेनंतरही चिनी सैन्याने गस्ती मनोरा क्रमांक चारपासून तीन किलोमीटर दूर अंतरावर जमवाजमव केली आहे.
याआधी चिनी सैन्याने गस्ती मनोरा चारहून मनोरा पाचपर्यंत माघार घेतली असल्याचे म्हटले जात होते; मात्र काही सैन्य अजूनही रिजघिलाइनवर उपस्थित आहेत. सॅटेलाइट फोटोनुसार, फॉक्सहोल पॉर्इंटच्या(FOXHALL POINT) पश्चिम भागाच्या तीन किलोमीटर अंतरावर चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी‘ तैनात आहे. याच कॅम्पच्या काही मागे काही किलोमीटर चिनी सैन्याला मदत करणारे एक कॅम्पदेखील आहे. एका सॅटेलाइट फोटोनुसार, चीनने लेहपासून ३८२ किलोमीटर दूर अंतरावर शिनजियांग प्रांतातील होटान एअरबेसवर भारताविरोधात फायटर एअरक्राफ्टशिवाय अर्ली वॉर्निंग अवाक्स एअरक्राफ्ट आणि एअर डिफेन्स युनिट तैनात केले आहेत.

चिनी क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात भारतीय शहरे

लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर भारतीय सीमेपासून काही दूर अंतरावर अणवस्त्रवाहू क्षमता असणारे डीएफ २६/२१ तैनात करण्यात आले आहेत. चीनने शिनजियांग प्रांतातील कोर्ला ठिकाणावर डीएफ-२६/११ वर क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. सॅटेलाइट इमेजमध्ये ही क्षेपणास्त्रे स्पष्टपणे दिसतात. या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता ही चार हजार किलोमीटर अंतर असून त्याच्या टप्प्यात भारतातील अनेक महत्त्वाची शहरे येतात.

Related Articles

Back to top button