मराठी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त गोरगरिबांना धान्य वाटप

गुरुदेव युवा संघाचा अभिनव उपक्रम

तिवसा/ दि. १२  – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 52 व्या पुण्यतिथीनिमित्त निमित्त गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी गोड गरीब दिव्यांगांना एक महिन्याच्या राशन किट चे वाटप केले आहे यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे चरित्र नागरिकांना त्यांनी पटवून सांगितले
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे अंधश्रद्धा निर्मूलन जाती भेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा वापर केला, तुकडोजी महाराज हे अत्याधुनिक काळातील महान संत होते विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते अध्यात्मिक सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन केले, तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त गोरगरीब जनतेला धान्याची किट तयार करून त्यांच्या घरपोच सुपूर्त करण्यात आली यावेळी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन केले
यावेळी निराधार महिलांना स्वखर्चाने निराधार योजनेचा लाभ मिळवून देणार असल्याचे घेतले तर आपण नेहमी गरिबांच्या हक्कांसाठी लढत राहू असे यावेळी गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी सांगितले

Related Articles

Back to top button