सोलर कस्टरला जिल्हाधिकारी शैलेश नवल यांची भेट
अमरावती/प्रतिनिधि , दि. ६ :
जिल्हा खादी ग्रामोद्योग अमरावती अंतर्गत कस्तुरबा सोलर खादी महिला समिती, अमरावती येथील, एमआयडीसी
कार्यान्वित प्रकल्पाला अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री शैलेश नवल यांनी नुकतीच सदिच्छा भेट देऊन महिलांनी महिलांसाठी चालवण्यात येणाऱ्या देशांतर्गत एकमेव प्रकल्पाचे जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले अमरावती जिल्ह्यातील महिला बचत गट आर्थिक दृष्ट्या सक्षम स्वयंपूर्ण व्हाव्यात व त्यानुसार केंद्रशासित प्रणित सोलर चरखा अंतर्गत जिल्ह्यातील एकूण तीनशे महिला या प्रकल्पात कार्यान्वित आहे सोलर चरख्यावर सूत काढून त्या सुतापासून कापड निर्मिती चे काम या कस्तुरबा सोलर खादी महिला समिती चे अंतर्गत चालू आहे या कापड निर्मितीला बाजारपेठ, व खादी महिला समितीने निर्मित कापडाला भविष्यात मार्केटिंग उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी कस्तुरबा च्या अध्यक्षा सौ रुपाली खडसे, सचिव, सौ प्रणिता किडीले, उपाध्यक्ष सौ कल्पना शेंडोकर , विमल बिल गये, वर्षा चौधरी, सौ मंजू संजय ठाकरे, सौ भाग्यश्री मोहिते, सौ वर्षा जाधव, कस्तुरबा च्या सीईओ, कुमारी केतकी बोरकर, ऑपरेशन मॅनेजर श्री नेत्रदीप चौधरी, धारणी प्रकल्पाचे इन्चार्ज श्री सुमित नागपुरे, प्रकल्पाचे कोषागर शरद कोल टेके, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, सौ अश्विनी देशपांडे, लॅब असिस्टंट सौ मयुरी खरबडे हे प्रामुख्याने उपस्थित होते,