मराठी

शिक्षक समिती महिला आघाडीचा जिल्हास्तरीय महिला स्नेहमिलन सोहळा संपन्न

जिल्हातील शेकडो शिक्षिका उपस्थित

अमरावती दि.८ – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा महिला आघाडीचा जिल्हास्तरीय महिला स्नेहमिलन सोहळा संत गाडगेबाबा सभागृह अमरावती येथे रविवारला आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने तथा दीपप्रज्वलनाने झाली. येणाऱ्या प्रत्येक महिला भगिनींचे स्वागत करून, हळदीकुंकू व वाण देण्यात आले. कार्यक्रमाला खरी रंगत व बहार आणली ती विविधांगी स्पर्धांनी. महिलांच्या गेसिंग गेम, गायन स्पर्धा, बॉल गेम, वन मिनिट शो, उखाणे स्पर्धा यांचे दमदार आयोजन असल्यामुळे सर्व महिला उत्साहित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात अश्विनी जगताप यांच्या ओम नमः शिवाय या वेलकम डान्सने झाली. स्नेहभोजनाचा आस्वाद घेत महिला भगिनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाल्या. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकलदास राऊत, जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाळे, कार्याध्यक्ष मनीष काळे, राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर, तालुकाध्यक्ष अजयानंद पवार, उमेश चुनकिकर,तुळशीदास धांडे, छगन चौधरी, योगीराज मोहोड, सुनील बोकाडे, गजानन कावलकर, रामदास भाग्यवंत, प्रमोद ढाकुलकर, देवेंद्र खैर, सूने सर यांनी सदिच्छा भेट दिली. जिल्हाध्यक्ष गोकुलदासजी राऊत यांनी सभागृहाला संबोधित करताना मोलाचे मार्गदर्शन केले. महिला आघाडीप्रमुख सरिता काठोळे, राज्य महिला प्रतिनिधी प्रविनाताई कोल्हे, जिल्हा सरचिटणीस योगिता जिरापुरे, कार्याध्यक्ष सुषमा वानखडे, कोषाध्यक्ष भावना ठाकरे, संचालिका अर्चना सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अविरत सूत्रसंचालन योगीता जिरापुरे यांनी केले. भावना ठाकरे, लीनता पवार, सुषमा वानखडे यांनी इतर कार्यक्रमांचे निरीक्षण केले. कार्यक्रमाला लता टेंबरे, लता उदापुरे स्वाती चव्हाण, प्रतिमा बोंडे, जयश्री खोबरे, अंजली होले, प्रियंका देशमुख, मोनिका देशमुख, सुनिता ठाकूर, ममता मात्रे, सविता ढाकरे, संध्या पाटील, ज्योत्स्ना शेटे, सुशीला आत्राम, मालती कांडलकर, शुभांगी निंबोळे तसेच इतर शेकडो महिला भगिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सरिताताई काठोळे, योगिता जिरापुरे, भावना ठाकरे, मोनिका देशमुख, दीपक काठोळे, सौरभ काठोळे यांनी अविरत श्रम घेतले.

Related Articles

Back to top button