वरुड दि.१३ – हुंड्याची मागणी केल्यानंतर हुंडा न दिल्याच्या कारणावरुन तलाक देणा:या पती, दिर व सासरा यांना वरुड पोलिसांनी अटक केली असुन या तिघांचीही अमरावती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तिघांविरुद्ध फिर्यादीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे तलाकचा कायदा लागु झाल्यानंतर वरुड तालुक्यात गुन्हा दाखल झाल्याची ही पहिलीच घटना आहे, असे बोलल्या जात आहे.
शहरातील २४ वर्षीय महिलेचा विवाह जलालखेडा येथील साहिल शेख याचेशी काही वर्षांपुर्वी झाला होता. काही दिवसपर्यंत दोघांचा संसार सुरळीत चालला; परंतु त्यानंतर दोघांमध्ये वेगवेगळ्या कारणांवरुन वादविवाद होवु लागले. लॉकडाऊनच्या काळात हा वाद एवढा विकोपाला गेला की, सदर विवाहितेच्या माहेरील मंडळींनी विवाहितेला माहेरी घेवुन आले. त्यांनतर माहेरील मंडळींनी अनेकदा प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. अनेकदा मध्यस्थी सुद्धा करण्यात आली. परंतु सासरकडील मंडळी काही ऐकुन तयार नसल्याने अखेर सदर विवाहिता पोलिस स्टेशन गाठुन यासंदर्भात दाखल केली. या तक्रारीवरुन वरुड पोलिसांनी पती साहील शेख सईद पटेल (२७), सासरे सईद शौकत अन्वर पटेल (६०), सासु शबना सईद पटेल (५५), दिर सैफ सईद पटेल (२४), सर्व रा.जलालखेडा, ता.नरखेड, जि.नागपुर, हुमा साजीद शेख (३६) रा.भंडारा, खुर्शीदा सलीम शेख (६०) रा.नागपुर, भांदवि ४९८ (अ), ५०४, ५०६, ३४ सह कलम ४ मुस्लिम विवाह अधिनियम संरक्षण कायदा हुंडा प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी वरुड पोलिसांनी पती, दिर व सास:यासह इतरांना अटक केली होती. यापैकी या तिघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावुन दुस:या दिवशी या सर्वांची अमरावती येथील जिल्हा कारागृहात या सर्वांची रवानगी करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांच