मराठी

दिव्यांग बांधवांसाठी ‘दिव्यांग अस्मिता अभियाना’त विशेष शिबिरे

अमरावती, दि. 6 –  दिव्यांगत्व तपासणी, मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठी दिव्यांग अस्मिता अभियानात तालुकानिहाय विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी आज सांगितले.अमरावती जिल्हा रूग्णालयात दि. 15 डिसेंबर रोजी व महिन्यातील प्रत्येक बुधवारी शिबिर होईल. इतर उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालयांच्या ठिकाणीही शिबिरे होणार आहेत. त्यानुसार चुरणी येथे 17 डिसेंबरला, चिखलदरा येथे 24 डिसेंबरला, वरूड येथे 31 डिसेंबरला, अंजनगांव सुर्जी येथे 7 जानेवारी 2022 रोजी, चांदूर रेल्वे येथे 14 जानेवारी, धामणगाव रेल्वे येथे 21 जानेवारी, नांदगाव खंडेश्वर येथे 28 जानेवारी, चांदूर बाजार  येथे 4 फेब्रुवारी, मोर्शी येथे 11 फेब्रुवारी, दर्यापूर येथे 18 फेब्रुवारी, भातकुली येथे 25 फेब्रुवारी, तिवसा येथे 4 मार्च, अचलपूर येथे 11 मार्च रोजी शिबिर होईल. ज्या दिव्यांग बांधवांनी सन 2018 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन युडीआयडी पोर्टलवर दिव्यांग अर्ज ऑनलाईन माध्यमातून भरलेले असतील, परंतु हे दिव्यांग बांधव जिल्हा सामान्य रूग्णालयामधील तज्ज्ञ वैद्यकिय अधिकारी यांच्यासमक्ष तपासणीकरिता उपस्थित राहिलेले नसतील अशा बांधवानी ऑनलाईन अर्ज व मूळ कागदपत्रांसह शिबीरस्थळी दिव्यांग तपासणीकरिता उपस्थित राहावे. नविन दिव्यांग बांधवांनीही ऑनलाईन फॉर्म व मूळ कागदपत्रांसह शिबीरस्थळी उपस्थित राहावे.  कॅन्सर, हदयरोग, टि .बी., एचआयव्ही, चर्मरोग, पोटाचे आजार इत्यादी आजार असणाऱ्या नागरिकांनी दिव्यांग ऑनलाईन फॉर्म भरू नयेत. कारण सदर आजार केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्तीस अधिनियम 2016 अन्वये मार्गदर्शन सुचनेनुसार दिव्यांगत्वामध्ये मोडत नाहीत, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button