वरुड दी ३ – कोरोना विरुद्धच्या लढ्यात फंटलाईन वॉरियर म्हणुन कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी व स्टाफला आता संरक्षणात्मक किटमुळे विविध समस्यांना सामोरे लावे लागत आहे. सहा तासांपेक्षा अधिक पीपीई कीट घालणारे डॉक्टर व स्टाफ डोके दुखी, चक्कर आणि वाढत्या रक्तदाबांच्या समस्येला बळी पडत असल्याचे समोर येत आहे.
कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. रुग्णालयांचे वॉर्ड फुल्ल झाले असुन अतिदक्षता विभागात खाट मिळणे अतिदक्षता विभागात खाट मिळणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत ख:या अर्थाने डॉक्टर लढवण्यासारखे काम करीत आहेत. डॉक्टरांसाठी हॉटस्पॉट झाले आहे. संसर्ग टाळण्यासाठी पीपीई किटचा वापर केला जातो.
रुग्णालयात लॅमिनेटेड व नॉन लॅमिनेटेड अशा दोन्ही प्रकारच्या कीट उपलब्ध आहेत; मात्र महागडी कीट व मागणीच्या तुलनेत पुरवठा अल्प होत असल्याने डॉक्टरांना साधारण सहा ते आठ तास ते घालुन रहावे लागते. एकदा कीट घातल्यास खाणेपिणे करता येत नाही. वॉशरुममध्ये जाणे देखील टाळले जाते. काही डॉक्टरांसाठी अॅडल्ट डायपर्सचाही वापर करतात व पीपीई किट काढुन कचरापेटीमध्ये टाकल्यावरच ते सामान्य जीवनात परत येतात. लॅमिनेटेड म्हणजे प्लॉस्टिक कोट असलेल्या किटमुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत.