शेतकर्यांच्या संयमाचा अंत पाहू नका
शेतकरी आंदोलनाच्या मुख्य मंचावरुन प्रशांत सोनोने यांचा सरकारला इशारा
बुलढाणा दि १३ – देशात सध्या कार्पोरेट कल्चर विरुद्ध अग्रि कल्चर अशा दोन विषम संस्कृतीतील लढाई सुरू असून सरकार पूर्णपणे काॅर्पोरेट सेक्टरमधील दलालांच्या तालावर नाचत आहे. तरीदेखील शेतकरी संयमाने हा व्यवस्थेविरुध्दचा लढा लढत आहेत. मात्र आमच्या संयमाचा अंत पाहू नका अन्यथा गंभीर परिणाम होतील, असा इशारा सत्यशोधक शेतकरी सभेचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रशांत सोनुने यांनी दिल्ली येथे शेतकरी आंदोलनाच्या मुख्य मंचावरुन दिला आहे.
केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या अभूतपूर्व जनआंदोलनात सहभागी होण्यसाठी, पाठिंबा देण्यासाठी” घेरा डालो, डेरा डालो” शेतकरी संघर्ष जत्थ्यात आपके रोशन पाणि, सोबत घेऊन सत्यशोधक शेतकरी सभेचे दोनशेहून अधिक शेतकरी कार्यकर्ते दिल्ली येथे दाखल झाले आहेत. शाजापूर बाॅर्डर येथे विविध राज्यातून आलेल्या शेतकरी संघटनांसह सत्यशोधक सभेच्या कार्यकर्त्यांनी तळ ठोकला आहे. दरम्यान शेतकरी आंदोलनाच्या टिकरी व सिंधु बॉर्डरवरील मुख्य मंचावरुन तमाम शेतकऱ्यांना संबोधित करतांना प्रशांत सोनुने यांनी अतिशय आक्रमकपणे सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर टीका केली. देशाच्या अर्थव्यवस्थेचा मार्ग शेतीतून आहे. मात्र शेतकरी हवालदिल झाल्याने कधीनव्हे ते यंदा देशाचा जीडीपी वजा तेवीस इतका खाली आला आहे. सरकार कार्पोरेट लाॅबीच्या दबावात व हितसंबधात आंधळे होऊन बसलेले आहे. त्यांना थंडी पाण्यात आंदोलन करणारा शेतकरी दिसत नाही. त्यांच्या समस्या दिसत नाहीत. उलटपक्षी या शेतकऱ्यांना नक्षलवादी, दहशतवादी ,खलिस्थानवादीठरविण्याचा कट सरकार रचत आहे. व हे जनआदेलन अमानुषपने चिरडण्याचा प्रयत्न करित आहे,देशाचा कणा व कृषि संस्कृतीचा पाया असलेल्या जगाच्या पोशिंद्दयाला या जुल्मी व्यवस्थेने आज रस्त्यावर आणून देशोधडीला लावले आहे .भारताच्या विकासाचा रस्ता शेतशिवारातूनच जातो, अन्नदाता शेतकरी हाच बळी राजाचा वंशज व कृषि संस्कृतीचा महानायक आहे. शेतशिवारच भूमीजनांचा आदिअंत असतो, जे आहे ते हक्काचेे, हक्कानं मिळावे.अपार कष्टाने पिकविलेल्या दाळदाणंयाला, रक्ताचे पाणी करून गाळलेल्या घामाला योग्य दाम मिळावा त्यासाठी msp च्या खाली शेतमालाची खरीदी गुन्हा ठरावा असा एकच कायदा सरकारने पारित करावा एवढीच माफक इच्छा देशभरातील आंदोलन कर्त्या शेतकर्यांची आहे .श्रम संस्कृति विरूध्द बांडगूळ दल्ला संस्कृती असा संथर्ष अविरत चालू आहे. एक ईस्ट इन्डिया कंपनी आली तिने दिडशे वर्षे राज्य केले आतातर हजारो मल्टी नेशनल कारपोरेट कंपन्या येऊ घातल्या आहेत.अपरिमीत शोषणाद्वारे निव्वळ नफा कमविने एवढेच ज्यांचे उध्दिषटमात्र आहे. दहशत, धोकेबाजी, भय, आतंक, खूनखराबा, वैमनस्य,द्वेष हे कार्पोरेट सेक्टरचे गुणधर्म आहेत तर शेतकरी संस्कृतीने श्रम, बंधुभाव, सहिष्णुता, ,समूह विकास,ईमानदारी,प्रेम, आपुलकी व जिव्हाळ्याची शिकवण दिली आहे. म्हणूनच शेतकरी अतिशय संयमाने आपला लढा देत आहे, असे सांगून सोनुने यांनी सरकारने आमच्या संयमाचा बांध फुटण्याची वाट बघू नये अन्यथा येथील शेतकरी भगतसिंग बनून सरकारला त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रशांत सोनोने यांनी दिला.
भाषणादरम्यान दिलेले विविध संदर्भ व क्रांतीकारी शायरीमुळे सोनुने यांच्या भाषणाची दखल आंदोलनाच्या प्रमुख नेत्यांनीही घेतली तसेच विविध वृत्तवाहिन्यांवर देखील सोनुने यांचे भाषण प्रसारीत करण्यात आले. सामाजिक, साहित्यीक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह, स्वरा भास्करसह सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलावंतांनी देखील यावेळी सांस्कृतिक प्रतिरोध करून विरोध प्रदर्शन केले .घेरा डालो डेरा डालो या किसान संघर्ष जत्थ्याचे प्रवासा दरम्यान इन्दौर, उज्जैन,कोटा, जयपुर आदि ठिकानी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.जनसभा सुध्दा घेण्यात आल्या.