मराठी

डॉ. नितीन राऊत यांना “लाख को पचास” मोहिमेचे परिसर मार्फत निवेदन,

राज्यात १ लाख लोकसंख्येसाठी ५0 सिटी बसेस असाव्यात अशी महाराष्ट्रभरातून मागणी

अमरावती दि १८ – भारतातल्या शहरांमधील हवा प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील या हवा प्रदूषणाला खाजगी वाहनांची वाढती संख्या ही जबाबदार आहेच पण नागरिकांना रोजच्या प्रवासा करीत पुरेषा प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करून देणे देखील तितकेच महत्वाचे आहे. प्रवास तर आवश्यक आहेच. मात्र हवा प्रदूषण कमी करून पर्यावरण आणि मानव यांतील संघर्ष कमी करण्यासाठी एका सामायिक पर्यायचा आपण अवलंब करणे काळाची गरज बनली आहे. या भूमिकेतून SUM Net India /परिसर “लाख को पचास’ या मोहिमेद्वारे शहरात एक लाख लोकसंख्येमागे किमान पन्नास सिटीबस असाव्यात अशी मागणी शासन दरबारी करत आहे. या मोहिमेमध्ये भारताच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने एक लाख लोकसंख्येमागे किमान 50 बसेसची आवश्यकता आहे, हा घालून दिलेला मानदंड ठळकपणे अधोरेखित केला जात आहे.
शहरातील सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्था ही महत्वाच्या सेवांमध्ये केंद्र व राज्य सरकारने समाविष्ट करून नागरी या व्यवस्थेच्या विकासामध्ये हातभार लावावा त्या दृष्टीने “लाख को पचास या मोहिमेअंतर्गत राज्यातील विधानसभा सदस्यांची (आमदार) भेट घेऊन ही मागणी शासन दरबारी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवावी अशी विनंती करण्यात येत आहे.
राज्याचे ऊर्जा व स्त्रोत मंत्री मा. डॉ. नितीन राऊत यांची भेट परिसर व ‘लाख को पचास’ मोहिमेचे राज्य समन्वयक विकास तातड यांनी बिजली नगर स्थित विश्राम गृह, नागपूर येथे दिनांक 8/11/2020 रोजी भेट घेतली. मोहिमेसंदर्भात चर्चा करत माननीय मंत्री डॉ. नितीन राऊत यांना मागणी चे निवेदन देखील सुपुर्द करण्यात आले. मोहिमेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक विकास तातड म्हणाले, ‘या मोहिमेचा एक भाग म्हणून आम्ही राज्यातील सर्व आमदारांपर्यंत पोहोचत आहोत आणि शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी राज्य पुरस्कृत योजनेची मागणी करत आहोत.”
परिसर हि पर्यावरण विषयक संस्था सार्वजनिक वाहतुकीद्वारे पर्यावरणाच्या समतोलाकरिता मागील काही वर्षापासून काम करत आहे. सुरक्षित, ताणरहित आणि आरामात प्रवास करता आला पाहिजे, त्यासाठी शहरात बसेसची संख्या वाढवली पाहिजे म्हणून “लाख को पचास हि मोहीम Sustainable Urban Mobility Network (SUM Net India) यांनी ही मोहीम सुरू केली असून ‘SUM Net India हे भारतातील विविध व्यक्ती, स्वयंसेवी आणि सामाजिक संस्था तसेच शाश्वत वाहतुकीच्या कार्यास वाहिलेल्या चळवळी, अशा विविध समविचारी घटकाचा समूह आहे.
‘SUM Net India’ द्वारे द परिसर आयोजित “लाख को पचास” या मोहिमेअंतर्गत सिटी असेसच्या संख्या वाढवण्या करता सोशल मीडियाद्वारे शहर स्तरीय, राज्य स्तरीय वेबिनार आयोजित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व स्थानिक अशा सर्व स्तरातील वाहतूक विषयातील तज्ञ, पत्रकार, महिला, कामगार, बसवाहक, विद्यार्थी यांचा सहभाग होता. या सर्व मान्यवरांनी आपआपले अनुभव, सार्वजनिक वाहतुकीतील त्रुटी, समस्या आणि त्यावर काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात याबद्दल चर्चा केली, अतिमत महाराष्ट्र राज्यातील विविध शहरातील नागरिकांच्या, प्रवाशांच्या समस्या समजून घेत “लाख को पचास” ही मागणी आता जोर धरत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा
विकास तातड
9892686525

Related Articles

Back to top button