नवी दिल्ली/दि. ३१ – भारतीय जवानांनी चीनच्या सैन्याचा घुसखोरीचा प्रयत्न पुन्हा एकदा हाणून पाडला आहे. पँगाँग सरोवराजवळ चीनच्या सैन्याकडून पूर्ण तयारीनिशी घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण भारतीय सैन्याने तेवढ्याच आक्रमकतेने उत्तर देत चीनला पिटाळून लावले, अशी माहिती सूत्रांनी दिली. चीनने घुसखोरीचा प्रयत्न केलेलं हे नवे क्षेत्र आहे. चीनच्या सैनिकांनी मोठ्या प्रमाणात फौज घेऊन पँगाँग सरोवराच्या दक्षिण बाजूकडून पश्चिमेकडे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. या क्षेत्रावर ताबा मिळवणे हा चीनचा मुख्य हेतू होता, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. चीनने पुरेसे सैन्य घेऊन घुसखोरी केली होती; पण याची माहिती मिळताच अगोदरच शत्रूविरोधात दंड थोपटून उभे असलेले भारतीय सैन्य अधिक आक्रमक झाले आणि चीनच्या सैनिकांना परतवून लावले. दरम्यान, या वेळी कोणतीही झटापट झालेली नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली. चीनने आपल्या बाजूने सैन्य तैनात केलं आहे; पण या भागात चीनने कोणतेही बांधकाम केलेले नसल्यामुळे वाहनांची ये-जा शक्य नव्हती.
भारत-चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या या संघर्षाबाबत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैनिकांनी दोन्ही देशांदरम्यानच्या बैठकांमध्ये सहमती झालेले मुद्दे बाजूला सारत पुढे सरकरण्याचा प्रयत्न केला. पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील किनाèयावर चिनी सैनिकांच्या हालचालींचा भारतीय सैनिकांनी विरोध केला. या घटनेनंतर भारताने या परिसरात सैनिकांची तैनात वाढवली आहे. या संघर्षानंतर चुशूलमध्ये ब्रिगेड कमांडर स्तरावरील बैठक सुरू आहे. १५ जूनच्या रात्री गलवान खोèयात झालेल्या qहसक घटनेनंतर सीमेवर झालेली ही दुसरी सर्वांत मोठी घटना आहे. भारताचे सर्व जवान सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.