मराठी

शाळेजवळील मादक पदार्थांची विक्री होणार बंद…..

शिक्षण समिती सभापती आशिषकुमार गावंडे यांचा निर्णय

अमरावती दि १२- अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये एकुण 63 शाळा असून बहुतांश शाळेच्‍या 100 मिटरच्‍या अंतरामध्‍ये पाणटप-या तसेच दारुचे दुकाने तथा अवैध गुटखा विक्री स-हास पणे सुरु असल्‍याने शिक्षण समिती सभापती आशिषकुमार गावंडे यांनी ही सगळी विक्री तातडीने बंद करण्‍याचा अनुषंगाने तसा ठराव शिक्षण समितीच्‍या बैठकीत मंजुर करण्‍यात आला. शिक्षण समितीच्‍या सदस्‍यांचा या निर्णयाला बहुमताने पाठींबा मिळून हा प्रस्‍ताव समितीच्‍या सभामध्‍ये पारीत करण्‍यात आले. तसेच मनपा शिक्षण विभाग या निर्णयावर अंमलबजावणी करण्‍याची प्रक्रिया सुरु केली आहे.
मनपा शाळेच्‍या सर्व मुख्‍याध्‍यापकांना याबाबत प्रस्‍ताव सादर करण्‍याचे आदेश सुध्‍दा शिक्षण समिती सभापती आशिषकुमार गावंडे यांनी दिले. युवापिढी तसेच विद्यार्थी वर्ग नशेपासुन दुर राहण्‍याकरीता आशिषकुमार गावंडे यांनी हा प्रस्‍ताव शिक्षण समितीच्‍या बैठकीमध्‍ये ठेवला. अधिकांश शाळांच्‍या जवळ दारु विक्रीचे दुकान, गुटखा विक्री करणा-या पाणटप-या असल्‍यामुळे शाळेतील विद्यार्थी मधल्‍या सुट्टीमध्‍ये त्‍या पाणटप-यामुळे दिसतात. विद्यार्थी वाईट मार्गाला लागण्‍याची शक्‍यता असते. दारुच्‍या दुकानामध्‍ये सातत्‍याने असलेल्‍या गर्दीमुळे तसेच दर दिवसा त्‍या ठिकाणी होणा-या वादामुळे या कोमलमन असलेल्‍या विद्यार्थ्‍यांवर अतिशय दुष्‍परिणाम होत आहे. याकरीता सर्व शाळांच्‍या मुख्‍याध्‍यापकांना मनपा शाळेच्‍या 100 मिटर परिसरात असणा-या पाणटप-या आणि दारुच्‍या दुकानाची यादी मागविलेली आहे. सदर दुकाने त्‍वरीत बंद करण्‍याकरीता शिक्षण समिती सभापती आशिषकुमार गावंडे यांनी पुढाकार घेतला असून ज्‍या विभागाकडे संबंधीत विषय येतो त्‍या विभागांना सुचित करण्‍यात आले आहे.

Back to top button