मराठी

अमरावती विद्यापीठ इतिहास मंडळाने तयार केलेला ई-कन्टेन्ट अभ्यासक्रम

 महाराष्ट्रातील पहिला उपक्रम - डॉ. वाघ

  • कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचे हस्ते उद्घाटन

अमरावती दि १२ – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळाने बी.ए. भाग 1, 3 व 5 सेमिस्टरच्या अभ्यासक्रमाचे ई-कन्टेन्ट तयार केले असून महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम असल्याचे मत मुंबई विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. संदेश वाघ यांनी व्यक्त केले.  कोरोना काळात विद्याथ्र्यांना ऑनलाईन शिक्षण दिल्या जात असून शिकविल्या जात असलेला विषय विद्याथ्र्यांना समजावा, त्यांची रुची व जिज्ञासा वाढावी, यासाठी चित्रफित अभ्यासक्रमाला असलेल्या युनिटनुसार विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळाने तयार केली असून त्याचे विमोचन कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचे शुभहस्ते झाले.  उद्घाटनप्रसंगी बीजभाषण करतांना डॉ. वाघ बोलत होते.  यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रदीप खेडकर, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अविनाश मोहरील उपस्थित होते.
डॉ. वाघ म्हणाले, अमरावती विद्यापीठाच्या इतिहास मंडळाने तयार केलेला ई-कन्टेन्ट अभ्यासक्रमाचा उपक्रम कौतुकास्पद असून या उपक्रमाची दखल महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठे घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.  व्य.प. सदस्य डॉ. प्रदीप खेडकर यांनी या उपक्रमाबद्दल सर्व अभ्यास मंडळाचे सदस्य व अध्यक्षांचे अभिनंदन केले.  अधिष्ठाता डॉ. अविनाश मोहरील म्हणाले, जागतिकीकरणाच्या युगात इतिहास अभ्यास मंडळाने राबविलेला उपक्रम हा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहासात दखल घेणारा आहे.  ई-कन्टेन्ट इतिहास अभ्यासक्रमामुळे समाज, विद्यार्थी, संशोधक, व्याख्याते यांना सहजपणे इतिहास उपलब्ध झालेला आहे.  या पद्धतीने इतर विषयातील सर्वांनीच अभ्यासक्रम निर्माण केल्यास विद्यापीठाच्या नावलौकिकात भर पडेल.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर म्हणाले, नविन शैक्षणिक धोरणाच्या पार्·ाभूमीवर विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संतोष बनसोड व त्यांचे सहका­यांनी दोन महिन्यापासून परिश्रम घेवून एक तासाचे 93 व्हिडीओ बनविले आहेत.  इतिहासाच्या विद्याथ्र्यांसाठी अभ्यासक्रमाचे व्हिडीओ उपयुक्त असून सहज समजेल अशा सोप्या पद्धतीने तयार केले आहेत.  त्याची पी.डी.एफ. स्वरुपात सुद्धा माहिती उपलब्ध असून त्यामध्ये विषय व व्याख्यात्यांची नावे व लिंक आदींचा समावेश असल्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणा­या विद्याथ्र्यांसाठी उपयुक्त असल्याचे ते म्हणाले.
ई-कन्टेन्ट तयार करण्यासाठी इतिहास विषयाचे प्राध्यापक तसेच अभ्यास मंडळातील सदस्य डॉ. सिद्धार्थ जाधव, डॉ. कैलास गायकवाड, डॉ. नितीन सराफ, डॉ. प्रमोद चव्हाण, डॉ. कविता ताथेड, डॉ. मनिषा धापुडकर, डॉ. नारायणसिंह वर्मा, डॉ. कुसुमेन्द्र सोनटक्के, डॉ. चंद्रकांत सरदार, डॉ. श्रीहरी पितळे, डॉ. मिनल खेरडे, डॉ. प्रफुल्ल टाले, डॉ. गजानन साडेनर, डॉ. विपीन राठोड, डॉ. ओमराज गजभिये, डॉ. सच्चिदानंद बिच्छेवार, डॉ. नितीन चांगोले, डॉ. व्यंकटेश लांब, डॉ. अशोक भोरजार यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. नितीन सराफ, प्रास्ताविक डॉ. संतोष बनसोड, पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रमोद चव्हाण, आभार डॉ. सिद्धार्थ जाधव यांनी मानले, तर सर्व तांत्रिक बाजू डॉ. कैलास गायकवाड व डॉ. अर्चना मलिक, मुंबई यांनी सांभाळली.

Related Articles

Back to top button