मराठी

आधुनिक घरात परतली मातीची भांडी

जम्मू/दि.९ – काश्मीरमधील सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थापत्य अभियंता सायमा शफीला ’क्रॅल कुर’ कुंभार म्हणून ओळखले जाते. त्यांच्यामुळे काश्मीरच्या आधुनिक स्वयंपाकघरात पुन्हा एकदा मातीची भांडी परतत आहेत. यासाठी तिने बंगळूरच्या एका संस्थेत नक्षीदार कुंभारकाम शिकले आहे. सायमा पॉटरीला नैराश्यातून मुक्त करण्याचे सर्वोत्तम साधन मानते. सायमा शफी हिने काश्मीर खोर्‍यातल्या मातीच्या भांड्यात या कला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला. सायमा स्थापत्य अभियंता आहे. तिने तिच्या आवडीच्या छंदासाठी नोकरी सोडली. सायमाला लहानपणापासूनच कुंभारकाम करण्याची आवड आहे. तिने सांगितले, की मला लहानपणापेक्षा काहीतरी वेगळे करायचे होते. त्या दिवसांतही चिकणमातीची भांडी मला आकर्षित करीत असत. म्हणूनच मी कुंभारकला शिकून घेतली. शफी दक्षिण काश्मीरमधील खेड्यात राहते. तिने हे काम सुरू केले, तेव्हा तिच्यासमोर अनेक अडचणी आल्या. प्रथम तिला असे वाटले, की कुंभार कामासाठी आधुनिक उपकरणे आवश्यक आहेत. तिला विजेवर चालणारी मातीची उपकरणे बनविण्याची चाके आणि इतर सामान खरेदी करायचे होते; पण ही सामग्री खो-यात नव्हती. त्यांनी ही साधने ऑनलाईन मिळवण्याचा विचार केला; परंतु तेदेखील कठीण होते. मातीच्या भांड्यांसाठी काश्मीरमध्ये फक्त टेराकोटाची माती उपलब्ध होती. या मातीची भांडी मायक्रोवेव्हमध्ये वापरता येत नाहीत.
कुंभारकामात तज्ज्ञ असलेले लोक काश्मीरमध्येनसल्याचेही सायमाला समजले. मातीची भांडी कशी बनवायची हे शिकवणारे शिक्षक बंगळूरमध्ये आहेत, हे जेव्हा सायमाला कळले, तेव्हा तिने बंगळूरला जाण्याचा निर्णय घेतला. तिला तिथे पाहून लोकांना उत्सुकता वाटली. काश्मीरमधील एक स्थापत्य अभियंता तरुणी मातीची भांडी बनविण्याचे शिकण्यासाठी इतक्या दूर आली, हे पाहूनच अनेकांना आश्चर्य वाटले. शफीने येथे पाहिले, की सहा वर्षाच्या मुलींपासून सत्तर वर्षांच्या वृद्धांपर्यंत भांडी बनविण्यास शिकत आहेत. सायमाला काश्मीरमध्ये एक संस्था सुरू करायची आहे, जिथे लोकांना कुंभारकामविषयक सर्व शिक्षणाच्या सुविधा मिळू शकतील.

 

Related Articles

Back to top button