मराठी

फरूक अब्दुल्लांची ईडीकडून चौकशी

श्रीनगर/दि.२० – नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला अडचणीत आले आहेत. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या ४३ कोटीं रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अब्दुल्ला यांना श्रीनगर कार्यालयात बोलावून अंमलबजावणी संचालनालयाने त्यांची चौकशी केली. २०१२ मध्ये जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील सुमारे ४३ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारानशी संबंधित हे प्रकरण आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एप्रिल २००२ ते डिसेंबर २०११ या काळात जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनकडे ही रक्कम हस्तांतरित केली होती. उच्च न्यायालयाने सीबीआयकडे हा तपास सोपवताना स्थानिक पोलिसांवर अविश्वास दाखविला होता. फारूख यांचे चिरंजीव उमर अब्दुल्ला म्हणाले, की अंमलबजावणी संचालनालयाच्या समन्सला प्रतिसाद देऊ. फारूख यांच्या निवासस्थानी छापे टाकले गेलेले नाहीत. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी फारूक यांची यापूर्वी चौकशी केली गेली होती. चंदीगड कार्यालयात चौकशी केली होती, तेव्हा तपास यंत्रणेने त्यांच्याकडे कित्येक महत्त्वाची कागदपत्रे मागितली होती. त्या वेळी फारूक अब्दुल्ला यांनी १५ दिवसांची वेळ मागितली होती. या प्रकरणात एक वर्षाहून अधिक कालावधीनंतरही फारूक यांनी तपास यंत्रणेकडे कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. मार्च २०१२ मध्ये जेकेसीएचे कोषाध्यक्ष मंजूर वजीर यांनी माजी सरचिटणीस मोहम्मद सलीम खान आणि माजी कोषाध्यक्ष अहसन मिर्झा यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. लवकरच, आर्थिक घोटाळ्याशी संबंधित सुमारे ५० नावांची यादी तयार केली गेली. अब्दुल्ला यांनी तीन दशकांहून अधिक काळ जेकेसीएचे अध्यक्षपद सोडले होते.

Related Articles

Back to top button