मराठी

निवडणूक आयुक्त लवासा यांचा पदाचा राजीनामा

निवडणूक पॅनलच्या दुसरे क्रमांकाचे आयुक्त होते

नवीदिल्ली/दि. १८ – निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते निवडणूक पॅनलच्या दुसरे क्रमांकाचे आयुक्त होते. ते आपल्या पदाचा राजीनामा देऊन पुढील महिन्यात फिलिपिन्सची एशियन डेव्हलपमेंट बँकचे उपाध्यक्ष म्हणून रुजू होणार आहेत. लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोqवद यांच्याकडे सूपूर्द केला आहे. तसेच आपल्याला ३१ ऑगस्ट रोजी या पदावरून मुक्त करण्याची विनंती त्यांनी राष्ट्रपतींना केली आहे. आशियायी विकास बँकेने लवासा यांच्या नियुक्तीची १५ जुलै रोजी घोषणा केली होती. लवासा यांचा सार्वजनिक-खासगी भागीदारीत राजकीय आणि देशपातळीवर चांगला अनुभव आहे. त्यांना पब्लिक पॉलिसीचे सखोल ज्ञान आहे. तसेच खासगी क्षेत्रात त्यांचा अभ्यास आहे, असे एबीडी बँकेने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले होते.

Related Articles

Back to top button