नवी दिल्ली/दि. ३१ – राज्यसभेच्या(Parliament) उपसभापतिपदी १४ सप्टेंबर रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात निवड होईल. ११ सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर संसदेचे पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबरपासून सुरू होते. हे अधिवेशन १ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. संयुक्त जनता दलाचे खासदार हरिवंश नारायण सिंह यांना पुन्हा राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीला सामोरे जावे लागेल. सभागृह सदस्य म्हणून त्यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या सदस्यतेची पहिली मुदत यावर्षी नऊ एप्रिल रोजी पूर्ण झाली आहे. हरिवंश नारायण सिंह ऑगस्ट २०१८ मध्ये निवडले गेले होते.