मराठी

बंदरावरील हिंदुस्तान शिपयार्ड कंपनीचे क्रेन अचानक कोसळल्याने ११ जण ठार झाले.

क्रेन कोसळून ११ ठार

प्रतिनिधि / दि. १
विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम येथील ‘हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड’ परिसरात अचानक क्रेन कोसळल्याने मोठा अपघात झाला. हजारो किलो वजनाची ही क्रेन अंगावर कोसळल्याने या भागात काम करणाऱ्या ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

या दुर्घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. मदत आणि बचाव कार्य सुरू असून अजूनही या क्रेनखाली काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.  या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा उभा राहतो. डीसीपी सुरेश बाबू यांनी घटनेबद्दल माहिती देताना क्रेन अपघातात दहा जणांचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर काही वेळातच मृत्यूचा आकडा ११ वर पोहचल्याची माहिती विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी विनय चंद यांनी दिली. हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, या साईटवर १८ मजूर काम करत होते. अपघात घडला, त्या वेळी क्रेनच्या सहाय्याने लोडिंगची ट्रायल सुरू होती. या घटनेचे वृत्त समजताच पर्यटनमंत्री अवंति श्रीनिवासन यांनी अधिकाऱ्यांना तातडीने योग्य ती पावले उचलण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणमच्या जिल्हा आयक्त आणि शहर पोलिस आयुक्तांना क्रेन दुर्घटनेच्या घटनेनंतर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button