मराठी

रेती माफियांच्या मुसक्या आवळा

तालुक्यातील नागरिकांची प्रशासनाकडे मागणी

वरुड ४ सप्टेंबर – तालुक्यातील रेतीघाटांचा लिलाव अद्याप झाला नसला तरी रेतीघाटावरुन राजरोसपणे अवैध उत्खनन सुुरु आहे. शिवाय नियम धाब्यावर ठेऊन परप्रांतातील ओव्हरलोड रेती वाहतुक सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हे सर्व महसूल प्रशासनाच्या अर्थपुर्ण संबंधातूनच अवैध रेतीची साठवणुक शहरातील विविध भागात केल्या जात असल्याचे चित्र दिसुन येत असतांना सुध्दा महसुल प्रशासनातील अधिकारी कुंभकर्णी झोपेतच असल्याचे सोंग घेवुन असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु असून यासाठी आवश्यक असलेल्या रेतीची मोठ्या प्रमाणात क्षमतेपेक्षा जास्त रेती वाहनांमध्ये भरुन राजरोसपणे शहर तालुक्यातुन वाहतूक सुरु आहे. तालुक्यात पाच रेतीघाट असले तरी अद्याप या रेतीघाटांचा लिलाव झालेला नाही. असे असले तरी यातील पवनी, देऊतवाडा या रेतीघाटांवर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन सुरु असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवुन महसुल विभागाच्या आर्शिवादानेच रेती चोरटे सक्रिय झाल्याचे चित्र शहरासह तालुक्यात दिसुन येत आहे.
याशिवाय मध्यप्रदेश व नागपूर जिल्ह्यातील लगतच्या तालुक्यातून सुध्दा मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड रेती वाहतूक राजरोसपणे सुरु आहे. क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहनातून येत असतांना महसूल प्रशासनाने डोळ्यावर अर्थपुर्ण पट्टया बांधल्याने ती अवैध रेती वाहतुक या महसुल विभागातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यापैकी कोणालाच दिसून येत नाही. इतर तालुक्यातून रेती वाहतूक करतांना त्यासाठी वाहतूक परवाना घेणे बंधनकारक असते मात्र वरुड तालुक्यात नियमांना तिलांजली देऊन राजरोसपणे ओव्हरलोड रेती वाहतूक सुरु असल्याचे दिसून येते.
मध्यप्रदेशातून तालुक्यात येणा:या मार्गावर ओव्हरलोड अवैध वाहतुक रोखण्यासाठी आर.टी.ओ.चेक पोस्ट आहेत मात्र तेथे सुध्दा येणारे सर्व अधिकारी आर्थिक व्यवहारातुन हे सर्व वाहने पास करतात. तर दुसरीकडे संबंधित सर्वच विभाग अर्थपूर्ण संबंध जोपासुन कामात व्यस्त असल्याचे दाखवत असल्याने तालुक्यासह मोर्शी, अमरावती, अकोला येथील रेती तस्करांचे चांगलेच फावल्याचे दिसून येते. पकडले जाऊ नये म्हणून रस्त्यावरुन बेदरकारपणे भरधाव वेगात रेतीची वाहतूक तालुक्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरुन होत आहे तसेच क्षमतेपेक्षा अधिक रेती झाकुन नेली जात असल्याने ती मागील वाहनचालकांच्या डोळ्यांत उडत आहे. परिणामी अपघाताचे प्रमाणात सुद्धा वाढ झाली आहे. असे असले तरी संबंधित महसुल, पोलिस, परिवहन विभाग मूग गिळून असल्याने या प्रशासनासह या भागातील लोकप्रतिनिधींवर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे रेती माफियांच्या मुसक्या आवळण्याची मागणी आता नागरिकांमधुन मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे.- तालुक्यातील रेतीघाटांचा लिलाव अद्याप झाला नसला तरी रेतीघाटावरुन राजरोसपणे अवैध उत्खनन सुुरु आहे. शिवाय नियम धाब्यावर ठेऊन परप्रांतातील ओव्हरलोड रेती वाहतुक सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हे सर्व महसूल प्रशासनाच्या अर्थपुर्ण संबंधातूनच अवैध रेतीची साठवणुक शहरातील विविध भागात केल्या जात असल्याचे चित्र दिसुन येत असतांना सुध्दा महसुल प्रशासनातील अधिकारी कुंभकर्णी झोपेतच असल्याचे सोंग घेवुन असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु असून यासाठी आवश्यक असलेल्या रेतीची मोठ्या प्रमाणात क्षमतेपेक्षा जास्त रेती वाहनांमध्ये भरुन राजरोसपणे शहर तालुक्यातुन वाहतूक सुरु आहे. तालुक्यात पाच रेतीघाट असले तरी अद्याप या रेतीघाटांचा लिलाव झालेला नाही. असे असले तरी यातील पवनी, देऊतवाडा या रेतीघाटांवर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन सुरु असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवुन महसुल विभागाच्या आर्शिवादानेच रेती चोरटे सक्रिय झाल्याचे चित्र शहरासह तालुक्यात दिसुन येत आहे.
याशिवाय मध्यप्रदेश व नागपूर जिल्ह्यातील लगतच्या तालुक्यातून सुध्दा मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड रेती वाहतूक राजरोसपणे सुरु आहे. क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहनातून येत असतांना महसूल प्रशासनाने डोळ्यावर अर्थपुर्ण पट्टया बांधल्याने ती अवैध रेती वाहतुक या महसुल विभागातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यापैकी कोणालाच दिसून येत नाही. इतर तालुक्यातून रेती वाहतूक करतांना त्यासाठी वाहतूक परवाना घेणे बंधनकारक असते मात्र वरुड तालुक्यात नियमांना तिलांजली देऊन राजरोसपणे ओव्हरलोड रेती वाहतूक सुरु असल्याचे दिसून येते.
मध्यप्रदेशातून तालुक्यात येणा:या मार्गावर ओव्हरलोड अवैध वाहतुक रोखण्यासाठी आर.टी.ओ.चेक पोस्ट आहेत मात्र तेथे सुध्दा येणारे सर्व अधिकारी आर्थिक व्यवहारातुन हे सर्व वाहने पास करतात. तर दुसरीकडे संबंधित सर्वच विभाग अर्थपूर्ण संबंध जोपासुन कामात व्यस्त असल्याचे दाखवत असल्याने तालुक्यासह मोर्शी, अमरावती, अकोला येथील रेती तस्करांचे चांगलेच फावल्याचे दिसून येते. पकडले जाऊ नये म्हणून रस्त्यावरुन बेदरकारपणे भरधाव वेगात रेतीची वाहतूक तालुक्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरुन होत आहे तसेच क्षमतेपेक्षा अधिक रेती झाकुन नेली जात असल्याने ती मागील वाहनचालकांच्या डोळ्यांत उडत आहे. परिणामी अपघाताचे प्रमाणात सुद्धा वाढ झाली आहे. असे असले तरी संबंधित महसुल, पोलिस, परिवहन विभाग मूग गिळून असल्याने या प्रशासनासह या भागातील लोकप्रतिनिधींवर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे रेती माफियांच्या मुसक्या आवळण्याची मागणी आता नागरिकांमधुन मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे.

Related Articles

Back to top button