नवीदिल्ली/दि. ९ – ‘एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन‘ (EPFO) च्या बैठकीत २०१९-२० च्या व्याज दराबाबत निर्णय घेण्यात आला. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) वर सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी साडेआठ व्याज निश्चित केले आहे; परंतु सध्या ईपीएफओकडून केवळ ८.१५ टक्के व्याज दिले जाईल. उर्वरित ०.३५ टक्के व्याज डिसेंबरमध्ये दिले जाईल. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ८.६५ टक्के व्याज दिले गेले. मार्चमध्ये झालेल्या बैठकीत ईपीएफवर साडेआठ टक्के व्याज देण्याची शिफारस करण्यात आली होती. हे व्याज गेल्या सात वर्षांतील सर्वांत कमी आहे. नियमांनुसार, पगारदार लोकांना पीएफ खात्यात त्यांच्या पगाराच्या १२ टक्के आणि महागाई भत्त्याचे योगदान देणे बंधनकारक आहे. ज्या कंपनीत ते काम करतात, त्या कंपनीनेदेखील कर्मचा-यांच्या पीएफ खात्यात समान योगदान दिले पाहिजे. तथापि, कंपनीचा वाटा दोन भागात विभागलेला आहे. त्यापैकी ८.३३ टक्के पेन्शन योजनेत जातात. उर्वरित भाग पीएफ खात्यात जातो. निवृत्तीनंतरच ही रक्कम काढली जाते. तथापि, निवृत्तीपूर्वीच पीएफमधील पैसे काढण्याच्या काही अटी आहेत. पीएफ खात्यात जमा झालेल्या रकमेवर कंपाऊंqडगच्या आधारावर व्याज दिले जाते.
वर्षनिहाय व्याज
२०१४-१५ (९. ७५)
२०१५-१६ (८.८०)
२०१६-१७ (८.६५)
२०१७-१८ (८.५५)
२०१८-१९ (८.६५)