मराठी

अमरावतीतील पर्यावरण तज्ञांनी दिला उज्ज्वल भविष्यासाठी “सिटी बसेस” हा गुरुमंत्र

विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी शहराच्या पर्यावरणाची जबाबदारी घ्यावी

अमरावती/दि.१९ – शहरे वाढत आहेत , तसे प्रदूषण देखील. त्यात मुख्य कारण म्हणजे वाढत्या खाजगी वाहन संख्या ज्यामुळे संपुर्ण पृथ्वीला याचे परिणाम भोगावे लागत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाया अडचणीवर कितपत फायदेशीर असू शकते व आज वाढणाऱ्या प्रदूषणाला आपण कसे रोखू शकतो याविषयावर  परिसर व श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती आयोजित “Engage for Environment” या वेबिनार सिरीजच्या पहिल्या वेबिनार मध्ये अमरावती शहरातील सार्वजिक वाहतूक व्यवस्था व अमरावती शहराचे पर्यावरण यावर आधारित अमरावतीच्या पर्यावरण तज्ञांच्या उपस्थितीत दि. 19 मी रोजी दुपारी चार वाजता अभ्यासपुर्ण चर्चा झाली.
वेबिनार मध्ये डॉ. संगीता इंगोले , प्रा. व श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या पर्यावरण विभाग प्रमुख, डॉ. निशिकांत काळे, प्रा. व Nature Conservation society चे अध्यक्ष , यादव तरटे पाटील पर्यावरण अभ्यासक, प्रफुल्ल सावरकर, लेखक व पर्यावरण अभ्यासक तसेच यशराज इंगोले, युवा संधोधक हे चर्चासत्रात उपस्थित होते. चर्चा सत्रात प्रत्येक तज्ञांने अमरावती शहरात खाजगी वाहतूक व्यवस्थेचा अमरावतीच्या एकूण पर्यावरण व्यवस्था तसेच मानवी जीवनावर होणारा परिणाम यावर चर्चा केली. यात डॉ. संगीता इंगोले यांनी वायु प्रदूषणाचे अमरावती मधील मूळ कारण हे खाजगी वाहने आहेत तेव्हा यावर मात करण्यासाठी सिटीबसेस वाढाव्यात तसेच 15 वर्ष वाहने वापरल्यावर त्याचे योग्य पद्धतीत नियोजन करणे तसेच पर्यावरणाबाबत शहरात जनजागृतीची मोठी आवश्यकता आहे हा मुद्दा मांडला. डॉ. निशिकांत काळे यांनी अमरावती येथे १२ वर्षापूर्वी सिटीबसेसला घेऊन काम केले तेव्हा आज अमरावती मध्ये सिटीबसेस आहेत असे सांगितले मात्र तेव्हा १०० बसेस असाव्यात असे निकष मांडले असतांना सुद्धा आज अमरावती   शहराची आजची लोकसंख्या जवळपास 9 लाख असूनही फक्त २५ बसेस आहेत तेव्हा शहराचे सार्वजनिक वाहतुकीचे मॉडेल हे फक्त ऑटोवर आधारित आहे असे ते म्हणाले आज जवळपास १० हजार ऑटो अमरावती मध्ये चालतात. एक कार वर्षभरात 4.6 टन एवढे कार्बन निर्माण करते तेव्हा अमरावती मध्ये असलेल्या कार व ऑटो यामुळे निर्माण होणारे  कार्बन येत्या वर्षात पृथ्वीच्या , अमरावतीच्या एकूण जैवविविधता तसेच मानवी जीवनावर मोठे परिणाम करेल. आज अमरावतीमध्ये बसेची आवशक्यता कुठे व कशी आहे याचे संशोधन शैक्षणिक संस्थांनी करायला हवे असे देखील ते या प्रसंगी म्हणाले. त्यांच्यानंतर प्रफुल्ल सावरकर यांनी मानवी जीवनावर होणारे परिणाम मांडत असतांना आरोग्यात येणारे धोके तसेच अमरावतीमधील रोड लगत असलेल्या वस्ती व तेथील लोकांचे बदलत जाणारे मानसिक व शारीरिक बदल याबाबत चर्चा केली. यादव  पाटील यांनी अमरावतीच्या आजुबाजुच्या जैवविविधतेवर होणारे परिणाम सांगितले. शेवटी  यशराज यांनी त्यांच्या अभ्यासाअंतर्गत त्यांनी अमरावती शहरतील विविध भागातील ३६०० लोकांच्या मुलाखती आधारे मांडलेल्या माहितीनुसार फक्त 4.8% अमरावतीकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरतात असे सांगितले तर 9 लाख लोकसंख्या असलेल्या शहराला २५ बसेस असल्यामुळे लोकांनी खाजगी वाहतुकीचा वापर म्हणजे नाईलाज होय असे स्पष्ट केले.
अमरावतीच्या शाश्वत विकासाची स्वप्ने बघायची असल्यास येथील सिटीबसेस वाढणे गरजेचे आहे कारण फक्त पर्यावरण नाही तर सामजिक, आर्थिक, आरोग्य असे अनेक घटक यावर आधारत आहे व त्याकरिता शैक्षणिक संस्थांनी व युवकांनी पुढाकार घेत या विषयावर संशोधन करावे आपली सामजिक जबाबदारी पहाता हे पाऊल उचलने गरजेचे आहे. शेवटी प्रश्नोत्तरांच्या तासात सर्वांनी हे मत मांडले. त्याकरिता उज्ज्वल महाराष्ट्र हि एक उत्तम योजना शासनाद्वारे चालविली जाते त्यात महाविद्यालयांनी सहभागी व्हावे असे आव्हान देखील या तज्ञांनी यावेळेस केले.
लाख को पचास या मोहिमेंतर्गत हि वेबिनार सिरीज चालविली जात असून परिसर व सम नेट यांच्या मार्फत लाख को पचास हि मोहीम मागील मार्च पासून राज्यभर चालू आहे. लाख को पचास हि मोहीम 1 लाख लोकांवर  50 सिटीबसेस असाव्यात असे आव्हान करते. या वेबिनारला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित असून प्राध्यापक , पर्यावरण विषयाचे अभ्यासक देखील होते. सदर वेबिनारचे संचलन प्रशांत राठोड व विकास तातड यांनी केले असून शेवटी संपुर्ण चर्चेचा सारांश परीसरर्तर्फे रंजित गाडगीळ व परिसरचे संस्थापक अध्यक्ष सुजित पटवर्धन यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन प्रशांत राठोड यांनी केले असू सदर चर्चासत्र परीसरच्या फेसबुक पेजला उपलब्ध आहे.

 

Related Articles

Back to top button