मराठी

वडीलांच्या संपत्तीत मुलींना समान हक्क

सर्वोच्च न्यायालयाने चा निर्णय

नवी दिल्ली दि. ११ – आपल्या वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीवर मुलावर समान अधिकार असेल. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय सुनावला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे, की मुलीने वडीलांच्या मालमत्तेत बरोबरी करण्याचा अधिकार आहे. सुधारित हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार हा मुलींचा हक्क आहे. हिंदू महिलेला तिच्या वडिलांच्या मालमत्तेत तिच्या भावाइतकाच हिस्सा मिळेल. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हिंदू उत्तराधिकार कायद्यात केलेल्या दुरुस्तीचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे, की कायदा दुरुस्त होण्यापूर्वी एखाद्या वडीलांचा मृत्यू झाला असता, तरीही त्यांच्या मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळेल.

न्यायालयाने म्हटले आहे, की ९ सप्टेंबर २००५ पूर्वी आणि नंतर हिंदू अविभाजित कुटुंब-एचयूएफच्या मालमत्तांमध्ये मुलींना वाटा मिळेल. जर मुलगी हयात नसेल, तर तिच्या मुलांना मालमत्तेत हिस्सा मिळण्यास पात्र मानले जाईल. २००५ मध्ये असा कायदा करण्यात आला. त्यात म्हटले होते, की मुलगा व मुलगी यांना त्यांच्या वडीलांच्या मालमत्तेवर समान हक्क असतील.

२००५ पूर्वी वडिलांचा मृत्यू झालेला असल्यास अशा कुटुंबात कायदा लागू होईल, की नाही, याबाबत साशंकता होता. न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा कायदा सर्व परिस्थितीत लागू होईल असा निर्णय दिला आहे. याअंतर्गत पितृ संपत्तीत मुलींना समान वाटा देण्याची तरतूद आहे. यानुसार कायदेशीर वारस म्हणून मुलीच्या वडीलांच्या मालमत्तेवर मुलाइतकाच हक्क आहे. याचा लग्नाशी काही संबंध नाही.

Related Articles

Back to top button