वरही जेव्हा वधूचे दर्शन घेतो…!
कोलकात्ता/दि. १७ – काही जोडप्यांचा असा विश्वास आहे, की ज्या प्रकारे वधू वराच्या पायाला स्पर्श करते, त्याच प्रकारे वरांनीही वधूच्या पायाला स्पर्श केला पाहिजे. वरानेही वधूचा आशीर्वाद घ्यावा. ही केवळ अपेक्षा नाही, तर असा प्रकार पश्चिम बंगालमध्ये झाला असून समाज माध्यमाच त्याचे चांगलेच काैतुक होते आहे.
आपल्या समाजात लग्नाच्या वेळी केल्या जाणा-या विधींना विशेष महत्त्व असते. वधूने वरच्या पायाला स्पर्श करणे आणि वधूचे शूज लपविणे ही देखील एक परंपरा आहे. अशीच परंपरा पश्चिम बंगालमध्येही आहे. तिथे लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाल्यावर वधू वराच्या पायाला स्पर्श करते आणि आशीर्वाद घेते. आता काळ बदलला आहे आणि काही जोडप्यांनी विश्वास ठेवण्यास सुरुवात केली आहे, की ज्या प्रकारे वधू वराच्या पायाला स्पर्श करते, त्याचप्रकारे वरानेदेखील वधूच्या पायाला स्पर्शून आशीर्वाद घ्यावा. वधू आणि वर दोघेही एकसारखे आहेत. नुकत्याच पार पडलेल्या बंगाली विवाहात असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्याचे लोक कौतुक करीत आहेत. इकडे वराचा आशीर्वाद घेण्यासाठी वधूने तिच्या पायाला स्पर्श करताच वरानेदेखील वधूचा आशीर्वाद घ्यायला सुरुवात केली. वधूच्या पायाला स्पर्श करून त्याने आपले औदार्य दाखविले.
ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच यूझर्सनी वराची स्तुती करण्यास सुरुवात केली. एका जुझर्सने सांगितले, की याला लग्नाच्या बंधनाचा सन्मान करणे म्हणतात. एकाने लिहिले, की नाते मजबूत करणे हे वर-वधू दोघांचेही कर्तव्य आहे. लग्नानंतर तुम्ही दोघांनीही लवकरच ही जबाबदारी पूर्ण केली. देव आपल्याला नेहमी आशीर्वाद देईल.