मराठी
अखेर बसपाच्या सिद्धांर्थ हरले यांची मृत्युशी झुंज थांबली
मोर्शी ३० – येथील ४० वर्षा पासून चळवळीत काम करणारे मिशनरी कार्यकर्ते सिद्धार्थभाऊ हरले यांचा मोर्शीवरून अमरावतीला बसपाच्या संविधान दीनाच्या कार्यक्रमला येताना अपघात झाला होता त्याना ब्रेनला मार असल्यामुळे नागपूर येथे हलविण्यात आले होते . येथील बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यानी नागपूर येथे मेड़़कल कॉलेज येथे जाऊन त्याना योग्य ते सहकार्य करण्याचे पराकाश्टेचे प्रयत्न केले .
परंतु २९ डिसेंबर ला रात्री 8 वाजता बहुजन समाज पार्टी मोर्शी च्या या खंद्या कार्यकर्त्याचा दवाखान्यात अंत झाला. व त्याबरोबरच एक झंजावती वादळ शांत झालं. जवळपास आपले सर्व आयुष बहुजन समाज पार्टी साठी वाहुन घेतलेला हा अवलीया मतदार संघतच नव्हे तर जवळपास संपूर्ण विदर्भातील बसपा चळवळीच्या कार्यकर्त्यांचा ओळखीचा होता.
खिशात व घरात अठराविश्व दारीद्र्य असनारा व्यक्ती नोटांचे बंडल पुढे ठेवले तरी खपला जात नाही असा अवलीया काळाच्या पडद्याआड गेला.त्यामुळेच या व्यक्ति विषयी एक अनामीक आदर समाजात रुढ झाला व त्याचा प्रत्यय अखेरच्या क्षणी जानवला.
आपण सर्व कार्यकर्ते कुठलाही विचार न करता अखेरच्या क्षणी धाऊन आलात मनुन बहुजन समाज पार्टी मोर्शी युनीट कडुन सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले असून आज दिनांक 30 नोव्हेंबरला मोर्शी येथे या खंड्या कार्यकर्त्याचा अंत्यविधी पार पडला.