मराठी

लॉकडाउन मधील वीज बिल माफ करा

भीम आर्मीचे महावितरणला निवेदन

अमरावती/प्रतिनिधी :- लॉकडाऊन मध्ये सर्व व्यवसाय आणि आर्थिक व्यवहार  बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. अश्यातच लॉकडाऊन दरम्यान  महावितरणने ग्राहकांना अवाजवी वीज बिल आकारले असून हे वीज बिल त्वरित माफ करण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन भीम आर्मी संघटनेच्या वतीने महावितरणला देण्यात आले.
भीम आर्मीचे प्रदेश महासचिव मनीष साठे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्रवीण बनसोड यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यकारी अभियंता सुचित्रा गुजर यांना याबाबत निवेदन देतांना बनसोड यांनी अवगत करून दिले की, कोरोना महामारीच्या काळात लोक जगण्याचा संघर्ष करीत असतांना सतत तीन महिने घराच्या बाहेर देखील पडले नाहीत शिवाय कमावण्याचे सर्व माध्यम बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची देखील वेळ आली अश्या कठीण परिस्थितीत महावितरण ने दिलासा देण्याऐवजी ग्राहकांना अवाजवी बिल देऊन एकप्रकारे अन्यायच केला आहे.त्यामुळे महावितरण ने येत्या आठ दिवसात ग्राहकांचे वीज बिल माफ करावे अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल असा इशारा भीम आर्मीचे प्रदेश महासचिव मनीष साठे यांचेसह शहराध्यक्ष प्रवीण बनसोड,निलेश जाधव, करण डेंडवाल, योगेश सूर्यवंशी, अशोक तायडे, दुर्गेश डोईफोडे, नवनीत तांतरपाळे, अजय शिरसाठ, नरेश नावंदर, सुधीर मोहोड, गजानन गवळी, सुशील वानखडे, प्रवीण वाकोडे, प्रवीण खंडारे, कुणाल तायडे, अक्षय काळे, उमेश थोरात, अवि भुयार, टिळक डेंडवाल यांनी दिला आहे.

Related Articles

Back to top button