मराठी

मिष्ठान्नाच्या डब्यावरुन कालबाह्य तिथी गायब

मिठाई विक्रेत्यांची मनमानी.अन्न औषधी प्रशासनाची सम्मती. नागरिकांच्या जीवाशी खेळ

परतवाडा/दि.१  – ऐन सणासुदीच्या काळात अन्न औषध प्रशासनाच्या सहकार्याने  मिष्ठान्न विक्रेत्यानी नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडल्याचे दिसते. ग्राहकाना विकत असलेल्या डबाबंद मिठाईच्या डब्यावर कालबाह्य तिथी, अवधी अर्थात किती कालावधीत याचा वापर करावा याची कुठल्याच प्रकारची सुचना नाही, ही धक्कादायक माहीती मिळाली.ग्राहकानी मिठाई खरेदी केली असता कुठल्याच प्रकारचे खरेदीपावती देत नसल्याने मिठाई खराब निघाल्यास मिष्ठान्न भंडारवाले हात वर करुन आपली जबाबदारी झटकत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने लक्ष देवुन संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहे.
   मिठाईच्या डब्यावर कालबाह्य तिथी लिहणे बंधनकारक असुनही अन्न व औषध प्रशासन व स्थानिक मिठाई विक्रेत्यांच्या साटेलोटे नागरिकांच्या सुरक्षेकडे साफ दुर्लक्ष करत आहे. नामांकित मिठाई विक्रेत्या कंपनीच्या डब्यावर मात्र नियमाचे पालन होत असल्याचे दिसुन येते.मात्रबहुसंख्य स्थानिक मिठाई विक्रेते नियमांचे उल्लंघन करुन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. पथ्रोट येथील मिठाई विक्रेत्यांचा उत्पादन तयार करणारा कारखाना मानवी वसाहतीत थाटला असुन घरगुती वापराचा गॅसबंबाचाही वापर होत आहे, तसेच भट्टीचा धुर मानवास हानीकारक ठरत असल्याची तक्रार स्थानीक रहीवासी करत आहे. याकडे प्रदुषण नियंत्रण मंडळ व ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
   दसरा, कोजागीरी पोर्णीमेला बर्‍याच मिठाई दुकानात ग्राहकासह दुकाणदारानी कोरोणा नियमाना तिलांजली देत गर्दी केली तर दुकाणदारानी कालबाह्य तिथीच्या सुचनेस खो दिला. याबाबत माॅ भवानी बिकानेर स्विटमार्टचे राजपुरोहीत याना विचारणा केली असता लवकरच कालबाह्य तिथी सुचनेचा शिक्का बनवुन डब्यावर उल्लेख करु असे सांगीतले.
    कुठलेही खाद्यपदार्थ ठराविक कालावधीत न वापरल्या गेल्यास ते खराब होत असुन विषबाधीत होत असुन बर्‍याच दुर्घटना घडल्याने ग्राहकानी खबरदारी घेण्याचे आवाहन वैद्यकिय अधिकार्‍यानी केले आहे. अन्न व औषधी प्रशासनाशी संपर्क केला असता संपर्क होवु शकला नाही.
Back to top button