मराठी
यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वप्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे - शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे
अमरावती/दि १० : राज्यातील यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा यासाठी आयएएस, आयएफएस, आयपीएसच्या तयारीसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्यावतीने (एसआयएसी) संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2021 च्या पूर्व प्रशिक्षणकरीता पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणास प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून प्रवेश परीक्षेचा अर्ज ऑनलाइन भरण्यास दि. 11 मार्च, 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेवून नागरी सेवेचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी केले आहे.
’एसआयएसी’च्या मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, व कोल्हापुर केंद्रातून हे प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. दिनांक 7 मार्च, 2021 ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक 11 मार्च, 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता, ऑनलाइन अर्ज भरण्याविषयी सूचना आदी माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर प्रवेश परीक्षेसाठी 13 मार्च रोजी मॉक चाचणी होणार असून 20 मार्च रोजी विविध केंद्रावरून परीक्ष घेण्यात येणार आहे. 28 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. तरी अमरावती विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या परीक्षेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी केले आहे.