मराठी

एकदरा ते खैरगाव पांदन रस्त्यामुळे शेतकरी झाले त्रस्त

चांदस वाठोडा दी २४ – येथुन जवळच असलेल्या एकदरा ते खैरगाव पांदन रस्त्यामुळे येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे हे फक्त सांगण्याकरिताच आहे की काय? असे वाटत आहे. तो स्वत: अहोरात्र मेहनत करुन पिक घेण्याचा प्रयत्न करतो पण शेतक:याची व्यथा ऐकुन घेण्यास कोणतेच अधिकारी व सरकार तयार नाही. असेच चित्र आज एकदरा ते खैरगाव पांदन रस्त्यावरील शेती असलेल्या शेतक:यांचे दिसून येत आहे. मौजा एकदरा ते खैरगाव येथील शेतकरी सतत पावसामुळे वाहतुकीसाठी त्रस्त झालेला आहे. अधिकारी वर्गांना पांदन रस्त्याकरिता काही वेळा निवेदन देऊन सुद्धा कोणत्याच प्रकारची सुधारणा त्या मार्गावर झालेली दिसून येत नाही. काही वर्षे अगोदर रस्ता व पूल बांधण्याकरिता उद्घाटन करुन फक्त गांजर देण्याचा प्रयत्न झालेला आहे; परंतु कोणतेही काम पुर्णत्वास झाले नाही व त्यामुळे त्या पांदन रस्त्यावरुन शेतकरी वर्गांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. आज शेतकरी हवालदिल झालेला आहे. कितीही निवेदन दिले तरी सुद्धा प्रत्यक्षात अधिकारी व राजकीय नेते लक्ष घालण्यास तयार नाहीत आणि म्हणूनच शेतकरी बांधवांनी विनंती केली आहे की, जर लवकरात लवकर पांदन रस्ता व त्यावरील पुलाचे काम पूर्णत्वास झाले नाही तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधव व त्याच्या कुटुंबांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मोर्शी विधानसभा आमदार देवेंद्र भुयार यामध्ये किती लक्ष घालतील? आणि काम पुर्णत्वास नेतील?
आमदारांनी स्वत: लक्ष घालुन आम्हाला न्याय मिळवुन द्यावा, अशी मागणी मोहन वडस्कर, योगेश गुरेजा, पंढरीनाथ कोल्हे, दिगांबर कोल्हे, शिवाजी कोल्हे, निर्मला कोल्हे, सुमन सातपुते, तनुजा वडस्कर, सदाशिव बानाईत, अंबादास बारमासे, भिमराव नेहारे, रामचंद्र राऊत, विजय कोल्हे, सर्वेश वडस्कर, गणपत राऊत, वनिता कासतकर आदी शेतकरी बांधवांनी केली आहे.

Back to top button