येवदा येथील महाराष्ट्र बँक मध्ये शेतकऱ्यांची बचत खाते अचानक बंद..
प्रहार संघटना सह शेतकरी होत आहे आक्रमक
अमरावती दी २९- जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मधून शेतकऱ्यांच्या थकित कर्जाच्या संलग्न बचत खात्यातील जमा असलेली रक्कम विड्रॉल करण्याची प्रक्रिया अचानक बंद केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. बचत खात्यात पैसे असून सुध्दा बँकेचे अधिकारी रक्कम विड्रॉल करीत नसल्याने थकीत शेतकऱ्यांनी प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदिप वडतकर यांना निवेदन दिले.
निवेदनाच्या अनुषंगाने प्रदीप वडतकर सह शेतकऱ्यांनी येवदा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखाचे व्यवस्थापक प्रफुल साखरे यांना चांगलेच धारेवर धरले. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना सन २०१९ च्या अनुषंगाने सन २०१५ ते २०१९ पर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज माफीबाबत महाराष्ट्र सरकारने घोषित केली आहे. संपूर्णपणे अंमलबजावणी न झाल्याने बऱ्याच प्रमाणात थकित शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीत आलेले नाहीत. सरकारने कर्ज माफी योजना बाबत घोषणा केल्यामुळे थकीत शेतकरी पीक कर्ज भरण्यासाठी थांबले आहेत.थकीत खातेदार एम पी एम मध्ये गेलेले आहेत.त्यामुळे बँकेचे अधिकारी बचत खात्यातून रक्कम विड्रॉल करत नाहीत.सध्या स्थितीत करोणा आजाराचा प्रादुर्भाव असल्याने सर्वच जनता अडचणी आहे.यावर्षीचे शेतकऱ्यांच्या घरात येणारे मुख्य पीक मुंग उडीद,सोयाबीन पावसाच्या अति दृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मुख्य पिकांची माती झाली आहे.
सध्या स्थितीत रब्बी पिकाच्या हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना बी-बियाणे घेणे तसेच शेती मशागती करिता पैशाची आवश्यकता आहे. काही शेतकऱ्यांच्या आरोग्य करिता सुद्धा पैसे काढता येत नसल्याने संकटाला समोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बचत खात्यामध्ये जमा असलेली रक्कम बँक विड्रॉल करीत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे .तरी सदर शेतकऱ्यांच्या बचत खात्यामधून जमा असलेली रक्कम विड्रॉल करण्याची प्रक्रिया पूर्ववत करण्यात यावी याबाबतीत बच्चुभाऊ कडू , तसेच शैलेश नवाल जिल्हाधिकारी सह महाराष्ट्र बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमुद केल्या प्रमाणे बँकेच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करून शेतकऱ्यांच्या बचत खात्यातून रक्कम विड्रॉल देण्याची प्रक्रिया पूर्ववत करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने येवदा येथील बँक शाखेत दिनांक १/१०/२०२० रोजी सकाळी ११ वाजता तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे प्रहारचे प्रदीप वडतकर यांनी दिला आहे.