मराठी

३३ केव्ही उपकेंद्रातुन शेतक:यांना मिळणार रात्रीला वीज

सहाय्यक अभियंता विनायक वाडवे यांची माहिती

शेंदुरजनाघाट २ नोव्हेंबर – रब्बीच्या पिकांचे सिंचन करण्यासाठी स्थानिक ३३ केव्हीच्या विज उपकेंद्रातुन रात्रीच्या वेळीही विजपुरवठा केला जाणार असल्याची माहिती शेंदुरजनाघाट उपविभागाचे सहाय्यक अभियंता विनायक वाडवे यांनी दिली.
कोरोना या भयंकर महामारीच्या काळातही शेंदुरजनाघाट येथील सहाय्यक अभियंता विनायक वाडवे यांनी नागरिकांकरिता विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याकरिता कर्मचा:यांसह त्यांनी अहोरात्र प्रयत्न केलेत. आता ३३ केव्ही उपकेंद्र शेंदुरजनाघाट येथुन निघणा:या ११ के व्ही मालखेड भागातील शेतीसाठी विज वाहनीद्वारे शेतक:यांना रात्रपाळीला सिंगल फेज सल्पाय २८ ऑक्टोबरपासुन सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. यापुर्वी लोडशेडींगमुळे विज पुरवठा खडित राहत होता. रात्रीला शेतात राहणा:या शेतक:यांना सिंगल फेज लाईन मिळेल व रात्रीला खोपडीत अंधार राहणार नाही. तसेच ३३ के व्ही उपकेंद्र जामतळ येथुन निघालेल्या ११ केव्ही जामतळ-सातुनर विजवाहिनीचे सुद्धा काम पुर्णत्वास येत असल्यामुळे तेथील शेतक:यांना सुद्धा १०-१२ दिवसात हीच सुविधा मिळणार असल्याचे सहाय्यक अभियंता विनायक वाडवे यांनी सांगितले.

Back to top button