मराठी

कार्डीअॅक रुग्णवाहिकेकरिता आर्थिक मदत सुरुच

डॉ.राऊत दाम्पत्य, तेजस शिरभाते यांचा पुढाकार

वरुड प्रतिनिधी. ४ नोव्हेंबर – समाजप्रबोधन मंचच्या पुढाकाराने कार्डीअॅक रुग्णवाहिका उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील प्रसिद्ध हड्डी व वातरोग तज्ञ डॉ.महेंद्र राऊत व त्वचारोग, केस व सौंदर्य तज्ञ डॉ.शितल राऊत यांनी १ लाख रुपये तर युवा व्यावसायिक तेजस शिरभाते यांनी ११ हजार रुपये या रुग्णवाहिकेकरिता भरीव अशी मदत समाज प्रबोधन मंचला केली आहे.
समाजप्रबोधन मंचच्या पुढाकाराने लोकवर्गणीतुन रुग्णांकरीता कार्डीअॅक रुग्णवाहिका खरेदी केल्या जाणार आहे. वरुड शहरापासून नागपुर आणि अमरावतीचे अंतर दूर असल्यामुळे तेथपर्यंत रुग्ण पोहचण्याकरीता कार्डीअॅक रुग्णवाहिका महत्वाची असून त्या रुग्णवाहिकेतून रुग्णाला उपचाराकरीता नेल्यास रुग्ण सुरक्षित जावु शकतो अद्यापही वरुडमध्ये कार्डीअॅक रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. अशा स्थितीत समाजप्रबोधन मंच विविध उपक्रमाच्या माध्यमातून दानदात्यांना प्रोत्साहीत करुन या रुग्णवाहिकेकरीता दान मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
शहरातील प्रसिद्ध हड्डी व वातरोग तज्ञ डॉ.महेंद्र राऊत व त्वचारोग, केस व सौंदर्य तज्ञ डॉ.शितल राऊत यांनी या उपक्र माकरिता १ लाख रुपयांचे योगदान, तर युवा व्यावसायिक तेजस शिरभाते यांनी ११ हजार रुपयांचे योगदान समाज प्रबोधन मंचचे अध्यक्ष डॉ.प्रविण चौधरी यांच्या स्वाधीन केले.
या महत्वाकांक्षी उपक्रमासाठी २५ लक्ष रुपयाच्या निधीची आवश्यकता असून या पवित्र कार्यात देणगी देऊन अनेकांचे प्राण वाचवावे, असे आवाहन समाजप्रबोधन मंचच्या पदाधिका:यांनी केले आहे.
याप्रसंगी समाजप्रबोधन मंचचे अध्यक्ष डॉ.प्रविण चौधरी, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.राम गोधने, बालरोग तज्ञ डॉ.प्रफुल होले, डॉ.महेेंद्र राऊत, जितेन शाह, पिंटु ताथोडे, मनिष कुबडे, स्वप्निल वडवाले यांचेसह आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button