वरुड/दि.९ – अप्पर वर्धा धरणातून मासे चोरुन नेल्याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन बेनोडा (शहीद) पोलिसांनी एकाविरुध्द गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
पोलिस सुत्रानी दिलेल्या माहीतीनुसार, अप्पर वर्धा जलाशयातील विनापरवाना रात्रीच्या सुमारास मासोळीची चोरी करताना आरोपी किशोर शालीकराम मेश्राम (३०) रा.वर्धापूर वडाळा, ता.आष्टी याला ताब्यात घेतले असुन त्याच्याकडून हिरोहोंडा कंपनीची ४० हजार रुपये किंमतीची एम.एच.३२ एएन २७०६ क्रमांकाची शाईन व २० हजार रुपये किंमतीची एक क्विंटल मासोळी, १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल, ३० हजार रुपये किंमतीचे दोन जाळे आणि ६ हजार ६५० रुपये रोख असा एकुण १ लाख ६ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला असुन आरोपीला अटक करण्यात केली आहे.
दत्तात्रय मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्थेचे संचालक दादाराव राघोजी कुयटे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी किशोर मेश्राम यांच्या विरोधात भादंवि ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास बेनोडा (शहीद) पोलिस स्टेशनचे ठाणेदार मिलींद सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुदाम साबळे, मुरलीधर वानखडे, दिनेश राऊत, दिवाकर वाघमारे हे करीत आहे.